'कॉकरोच' हा लोकशाहीला धक्का नव्हे - रा.स्व. संघ 
राष्ट्रीय

'कॉकरोच' हा लोकशाहीला धक्का नव्हे - रा.स्व. संघ

भारतीय लोकशाहीमध्ये सर्व प्रकारचे विचार आणि भावना सामावून घेण्याची पूर्ण क्षमता असून, देशातील 'जेन झेड'चा (युवा पिढी) या व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे, असे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते सुनील आंबेकर यांनी केले आहे.

Swapnil S

नागपूर : भारतीय लोकशाहीमध्ये सर्व प्रकारचे विचार आणि भावना सामावून घेण्याची पूर्ण क्षमता असून, देशातील 'जेन झेड'चा (युवा पिढी) या व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे, असे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते सुनील आंबेकर यांनी केले आहे. 'कॉकरोच जनता पार्टी' (सीजेपी) च्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी शुक्रवारी नागपूर येथे पत्रकारांशी संवाद साधला.

सीजेपी संदर्भातील एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, लोकशाहीत होणाऱ्या कोणत्याही चर्चेकडे किंवा लोकांच्या वेगवेगळ्या मतांकडे धक्का म्हणून पाहिले जाऊ नये. हा लोकशाहीचा एक सामान्य भाग मानला पाहिजे. आपल्या देशातील माध्यमे आणि राजकीय पक्ष अशा गोष्टी हाताळण्यास सक्षम आहेत.

भारताची आजची तरुण पिढी देशाबद्दल अत्यंत आशावादी असून तिचा देशावर मोठा विश्वास आहे. हे सर्व तरुण घटनात्मक चौकटीत राहूनच काम करत आहेत. लोकशाहीत अनेक मुद्दे उपस्थित केले जातात आणि ते हाताळण्याचे लोकशाही मार्ग उपलब्ध आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Monsoon Update : मान्सूनचा काढता पाय; राजस्थानातून परतीचा प्रवास सुरू, हवामान खात्याची माहिती

लातूर बँकेच्या संचालकांना हटवण्याचे RBI चे आदेश

Mumbai : दादरमधील सीकेपी हॉलचा १२ ऑक्टोबरला लिलाव

पक्षचिन्हाच्या वादाबाबत ममता बॅनर्जी सर्वोच्च न्यायालयात

टॅरिफ विधेयकावर डोनाल्ड ट्रम्प यांची स्वाक्षरी