राष्ट्रीय

व्यापारासाठी भागीदार निवडण्याचा भारताचा अधिकार; रशियाकडून भारताची पाठराखण, अमेरिकेला फटकारले

कोणत्याही सार्वभौम देशाला व्यापारासाठी भागीदार निवडण्याचा अधिकार आहे, अशा शब्दात रशियाने भारताची पाठराखण केली आहे. भारत रशियाकडून कच्चे तेल खरेदी करत असल्याने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर अधिक ‘टॅरिफ’ लावण्याची धमकी दिल्याच्या पार्श्वभूमीवर रशियाने अमेरिकेला फटकारले.

Swapnil S

मॉस्को : कोणत्याही सार्वभौम देशाला व्यापारासाठी भागीदार निवडण्याचा अधिकार आहे, अशा शब्दात रशियाने भारताची पाठराखण केली आहे. भारत रशियाकडून कच्चे तेल खरेदी करत असल्याने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर अधिक ‘टॅरिफ’ लावण्याची धमकी दिल्याच्या पार्श्वभूमीवर रशियाने अमेरिकेला फटकारले.

भारताला दिलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर रशियन सरकारचे प्रवक्ते दिमित्री पेसकोव्ह म्हणाले की, कोणाशी व्यापारी भागीदारी, आर्थिक सहकार्य करावे, हा प्रत्येक सार्वभौम देशाचा अधिकार आहे.

रशियन तेल घेऊन भारत अधिक दराने ते विकत आहे. त्यामुळे आम्ही भारतावर अधिक दराने ‘टॅरिफ’ लावू, अशी धमकी सोमवारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली होती. अमेरिकन वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी ग्लोबल साऊथमधील राष्ट्रांविरुद्ध नववसाहतवादी धोरण सुरू ठेवल्याचा आरोप रशियन परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झकाहरोवा यांनी अमेरिकन प्रशासनावर केला. निर्बंध हे आजच्या ऐतिहासिक टप्प्यातील एक दुर्दैवी वास्तव आहे, ज्याचा परिणाम संपूर्ण जगावर होतो, असे त्यांनी सांगितले.

शिवाजी पार्कवर विनापरवानगी आंदोलन; ५०० जणांवर गुन्हे, दीपकेंसह आयोजकांचा समावेश

ऑक्टोबर महिना कसा जाईल? बघा तुळ आणि वृश्चिक राशीचे भविष्य

आजचे राशिभविष्य, ४ ऑक्टोबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

विकेंडला घरच्यांना द्या खास ट्रीट! अशी बनवा खमंग हैदराबादी चिकन बिर्याणी

ठाणे-बेलापूर मार्गावरील वाहतूक चार रात्री बंद; ऐरोली-काटई नाका पुलावर गर्डर टाकण्याचे काम, वाहनचालकांसाठी पर्यायी मार्ग जाहीर