एएनआय
राष्ट्रीय

संभल हिंसाप्रकरणी जामा मशिदीच्या प्रमुखाला अटक; दंगा भडकावण्याचा आरोप

संभल येथे झालेल्या हिंसाचाराला चार महिने झाल्यानंतर शाही जामा मशीद कमिटीचा प्रमुख जफर अली याला पोलिसांनी अटक केली आहे.

Swapnil S

लखनऊ : संभल येथे झालेल्या हिंसाचाराला चार महिने झाल्यानंतर शाही जामा मशीद कमिटीचा प्रमुख जफर अली याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर दंगा भडकावण्याचा आरोप आहे. दरम्यान, चंदौसी कोर्टात जफर अलीने सांगितले की, मी कोणतीही हिंसा भडकावली नाही.

पोलिसांनी जफर अलीला रविवारी सकाळी ११ वाजता घरातून उचलून नेले. ४ तास त्याची पोलीस ठाण्यात चौकशी केली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.

जफर अलीचे घर मशिदीपासून १०० मीटर लांब आहे. तणाव पाहता या भागात २०० हून अधिक पोलीस तैनात केले आहेत. पोलीस अधीक्षक के. के. बिष्णोई व पोलीस अधिकारी अनुज चौधरी यांनी येथे ध्वज संचलन केले.

संभल येथे २४ नोव्हेंबर रोजी जामा मशिदीचा सर्व्हे करताना हिंसाचार झाला होता. त्यानंतर २५ नोव्हेंबरला पोलिसांनी जफरला पकडून त्याची चौकशी केली होती.

२४ नोव्हेंबर रोजी झालेल्या संभल हिंसाचारातील १२ पैकी सहा प्रकरणात एसआयटीने चार हजारांपेक्षा जास्त पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रानुसार, या प्रकरणात एकूण १५९ आरोपी आहेत. हिंसाचाराच्या ठिकाणी आणि इतर ठिकाणांहून जप्त केलेली शस्त्रे युनायटेड किंग्डम, अमेरिका, जर्मनी आणि चेक रिपब्लिकमध्ये बनवण्यात आली होती, असे आरोपपत्रात नमूद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Maratha Reservation : सरकारचं आंदोलनाकडे दुर्लक्ष; मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, उद्यापासून पाणीही बंद, आमरण उपोषण अधिक तीव्र होणार

Maratha Reservation : ''...नाहीतर १००-२०० किमीच्या रांगा लागतील''; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा

''मानाला भुकालेलं पोरगं''; मनोज जरांगे यांची राज ठाकरेंवर टीका

बोलणी फिस्कटली; आंदोलन सुरूच! मनोज जरांगे-शिंदे समिती यांच्यातील चर्चा निष्फळ, हैदराबाद गॅझेट लागू करण्यास सरकारची तत्त्वतः मंजुरी

मराठी अभिनेत्री प्रिया मराठेचे निधन; कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी, वयाच्या ३८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास