राष्ट्रीय

इंदिरा गांधींच्या मारेकऱ्याचा मुलगा निवडणूक रिंगणात

इंदिरा गांधींचा अंगरक्षक बिआंत सिंग व सतवंत सिंग या दोघांनी ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. सरबजीत सिंग याने भटिंडा लोकसभा मतदारसंघातून २००४ रोजी निवडणूक लढवली होती. त्याला १.१३ लाख मते पडली होती.

Swapnil S

चंदिगड : माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा मारेकरी बिआंत सिंग याचा मुलगा सरबजीत सिंग (४५) याने पंजाबच्या फरीदकोट मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. या निवडणुकीत तो अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहे. सध्या फरीदकोट मतदारसंघातून अभिनेता करमजीत अनमोल हे ‘आप’कडून, तर भाजपकडून हंसराज हंस हे निवडणूक लढवत आहेत.

इंदिरा गांधींचा अंगरक्षक बिआंत सिंग व सतवंत सिंग या दोघांनी ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. सरबजीत सिंग याने भटिंडा लोकसभा मतदारसंघातून २००४ रोजी निवडणूक लढवली होती. त्याला १.१३ लाख मते पडली होती. २००७ मध्ये त्याने भदौर मतदारसंघातून निवडणूक लढवली. त्याचा या निवडणुकीतही पराभव झाला. २०१४ मध्ये त्याने पुन्हा निवडणूक लढवली. २०१४ मध्ये तो फतेहगड साहिब मतदारसंघातून उभा राहिला होता. तेथेही त्याचा पराभव झाला. त्याची आई बिमल कौर ही १९८९ मध्ये रोपार मतदारसंघातून विजयी झाली होती.

लाडक्या बहिणींना ई-केवायसी बंधनकारक; योजनेसाठी पारदर्शकतेला प्राधान्य देणार - अदिती तटकरे

मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर; ४०० हून अधिक चित्रपटांत उमटवला अभिनयाचा ठसा!

Latur : लातूरमध्ये पावसाचा कहर; ४० तासांनंतर सापडले ५ जणांचे मृतदेह

पुणे-नाशिक महामार्गावर गॅस टँकरची गळती; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

मनसेचा आज ट्रॅफिक मार्च; नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन