प्रातिनिधिक फोटो
राष्ट्रीय

एमबीबीएस, बीडीएस प्रवेशाची दुसरी फेरी २६ सप्टेंबरपासून

वैद्यकीय व दंत अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या फेरीतील प्रवेशाचे वेळापत्रक वैद्यकीय समुपदेशन समितीने जाहीर केले आहे.

Swapnil S

मुंबई : वैद्यकीय व दंत अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या फेरीतील प्रवेशाचे वेळापत्रक वैद्यकीय समुपदेशन समितीने जाहीर केले आहे. त्यानुसार राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून वैद्यकीय व दंत अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या प्रवेश फेरीला २६ सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. तर १ ऑक्टोबरपासून वैद्यकीय व दंत अभ्यासक्रमाचे शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे.

वैद्यकीय व दंत अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे वेळापत्रक नवी दिल्लीतील वैद्यकीय समुपदेशन समितीमार्फत जाहीर करण्यात येते. त्यानुसार प्रवेशाच्या वेळापत्रकाची अंमलबजावणी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून करण्यात येते. वैद्यकीय व दंत अभ्यासक्रमाची पहिली प्रवेश फेरी ५ सप्टेंबर रोजी संपली. या फेरीमध्ये रिक्त राहिलेल्या जागांवर प्रवेश करण्यासाठी वैद्यकीय समुपदेशन समितीने दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

कामगारांच्या कामाचे तास वाढणार नाहीत; कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्याकडून स्पष्टीकरण

मुंबईत घुसले १४ दहशतवादी, ३४ वाहनांमध्ये मानवी बॉम्बस्फोट घडवणार; अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना धमकी

Mumbai : लालबागच्या राजाचे अंतिम दर्शन घ्यायचे आहे? मग 'या' मार्गावर द्या बाप्पाला शेवटचा निरोप!

ओबीसी महासंघाचे उपोषण मागे; राज्य सरकारकडून १४ पैकी १२ मागण्या मान्य

बेकायदेशीरपणे झाडे तोडल्यामुळे आपत्ती; पूर आणि भूस्खलनावर सुप्रीम कोर्टाची टिप्पणी