राष्ट्रीय

धक्कादायक! दिल्ली असुरक्षित असल्याचं पुन्हा समोर ; कॅब चालकाला २०० मीटर फरफटत नेल्याचा व्हिडिओ व्हायरल

या घटनेत कॅबचालकाचा मृत्यू झाला आहे.

नवशक्ती Web Desk

दिल्लीच्या वसंत कुंज नॉर्थ भागात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका कॅब चालकास तब्बल २०० मीटर अंतरापर्यंत फरफटत नेत्याचा धक्कादाय प्रकार घटना आहे. ज्यात त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. काल रात्री पोलिसांना या घटनेबद्दल माहिती देण्यात आली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहचल्यानंतर त्यांना कॅब ड्रायव्हर रस्त्यावर गंभीर अवस्थेत आढळून आला.

पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, या घटनेतील आरोपी हे कॅब चालकास लुटत होते. यावेळी टॅक्सीच्या मालकाने विरोध केल्यानंतर त्याच्यावर हल्ला चढवला. यानंतर त्याला कारसोबत २०० मीटर पर्यंत फरफटत नेण्यात आलं. दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास सुरु आहे. मात्र, अद्याप आरोपी फरार आहेत.

असाच प्रकार काही दिवसांपूर्वी देखील समोर आला होता. अंजली नावाच्या महिलेला फरफटत नेण्यात आलं होतं. ज्यात अंजली यांचा मृत्यू झाला होता. या घटनेला १० महिने झाले आहेत. इतक्यातचं दिल्लीतील या दुसऱ्या घटनेचा व्हिडिओ समोर आल्याने सर्वांना धास्ती बसली आहे.

Maharastra Rain: मुसळधार पावसाची शक्यता; ऑरेंज अलर्ट जारी

शाहरुख खान लेकामुळे पुन्हा अडचणीत! समीर वानखेडेंची न्यायालयात धाव, २ कोटींचा मानहानीचा दावा

लडाख आंदोलनाला हिंसक वळण; भाजपचा कॉँग्रेसवर कटाचा आरोप

पुन्हा उभं राहण्याची आशा संपली! धाराशिवमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या; अतिवृष्टीने शेत गेलं वाहून

मुंब्रा-कळवा भागात पाणीटंचाई; पाणीटंचाईबाबत महापालिका मुख्यालयावर धडक; जितेंद्र आव्हाडांनी अधिकाऱ्यांना विचारला जाब