SIR मुळे तमिळनाडूत ९८ लाख मतदारांची नावे वगळली प्रातिनिधिक छायाचित्र
राष्ट्रीय

SIR मुळे तमिळनाडूत ९८ लाख मतदारांची नावे वगळली

‘एसआयआर’नंतर तयार करण्यात आलेल्या तमिळनाडूमधील मतदार यादीच्या मसुद्यामधून तब्बल ९७ लाख ३७ हजार ८३२ नावे वगळण्यात आली आहेत, तर नव्या मतदार यादीच्या मसुद्यामध्ये ५ कोटी ४३ लाख, ७६ हजार ७५५ मतदारांचा समावेश आहे.

Swapnil S

चेन्नई : सध्या देशातील काही राज्यांत सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या पुनर्निरीक्षणादरम्यान, तमिळनाडूमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ‘एसआयआर’नंतर तयार करण्यात आलेल्या तमिळनाडूमधील मतदार यादीच्या मसुद्यामधून तब्बल ९७ लाख ३७ हजार ८३२ नावे वगळण्यात आली आहेत, तर नव्या मतदार यादीच्या मसुद्यामध्ये ५ कोटी ४३ लाख, ७६ हजार ७५५ मतदारांचा समावेश आहे.

तमिळनाडूच्या मुख्य निवडणूक अधिकारी अर्चना पटनायक यांनी सांगितले की, मतदार याद्यांच्या पुनरीक्षणानंतर तयार करण्यात आलेल्या राज्यातील मतदार याद्यांच्या मसुदा यादीमध्ये ५ कोटी ४३ लाख, ७६ हजार ७५५ मतदारांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये २ कोटी ६६ हजार महिला आणि २ कोटी ७७ लाख पुरुषांचा समावेश आहे. ‘एसआयआर’पूर्वी तामिळनाडूमध्ये सुमारे ६ कोटी ४१ लाख नोंदणीकृत मतदार होते. तसेच या प्रक्रियेनंतर त्यापैकी तब्बल ९७ लाख ३७ हजार ८३२ मतदारांची नावे हटवण्यात आली आहेत.

हटवण्यात आलेल्या मतदारांमध्ये तब्बल २६ लाख ९४ हजार मृत मतदारांचा समावेश आहे. तर ६६ लाख ४४ हजार मतदार असे आहेत जे कायमस्वरूपी स्थलांतरित झालेले आहेत. त्याशिवाय ३ लाख ३९ हजार २७८ दुबार मतदारांची नावेही यादीतून हटवण्यात आली आहेत. या मतदारांची नावे एकापेक्षा अधिक ठिकाणी नोंवललेली दिसून आली, अशी माहिती अर्चना पटनायक यांनी दिली.

दरम्यान, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी केलेल्या तीव्र विरोधानंतरही तामिळनाडूमध्ये ‘एसआयआर’ची प्रक्रिया पार पाडण्यात आली आहे. स्टॅलिन यांच्या डीएमके पक्षाने ‘एसआयआर’विरोधात सर्वोच्च न्यायालयात एक याचिकाही दाखल केली होती. आता ‘एसआयआर’वर टीका करताना स्टॅलिन यांनी त्याचा लोकशाहीविरोधी पाऊल असा उल्लेख केला आहे. तसेच निवडणुकीच्या काही महिने आधी मतदार याद्यांचे पुनरीक्षण करण्याचा निर्णय हा मतदारांना हटवण्याचा जाणीवपूर्वक केलेला कट आहे, असा आरोपही स्टॅलिन यांनी केला.

डिसेंबरपर्यंत उन्हाचे चटके बसणार! एल निनोची तीव्रता वाढणार, सरासरीपेक्षा अधिक तापमान राहणार

ज्ञानेश कुमार यांच्यावरील याचिकांवर आज सुनावणी

ज्ञानेशांविरोधात 'गर्जना'; सर्वपक्षीय मोर्च्यात राज्यातील SIR रद्द करण्याची मागणी

नागरिकांचे मत काढून घेणारी प्रक्रिया मनमानी; सर्वोच्च न्यायालयाचे न्या. उज्ज्वल भुयान यांची चपराक

GST अधिकाऱ्यांवर आता लागणार लगाम; जीएसटी अंमलबजावणीत व्यापक सुधारणा होणार