SIR नंतर आता SSR ; मतदारयादीत नाव नोंदवण्यासाठी ६ राज्यांत सुरू होणार नवी मोहीम प्रातिनिधिक छायाचित्र
राष्ट्रीय

SIR नंतर आता SSR ; मतदारयादीत नाव नोंदवण्यासाठी ६ राज्यांत सुरू होणार नवी मोहीम

अरुणाचल प्रदेश, चंडीगड, दादरा आणि नगर हवेली व दमण आणि दीव, मिझोराम, ओदिशा आणि सिक्कीम या सहा राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार यादीचे वार्षिक विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (एसएसआर) करण्यात येणार असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने गुरुवारी जाहीर केले.

Swapnil S

नवी दिल्ली : अरुणाचल प्रदेश, चंडीगड, दादरा आणि नगर हवेली व दमण आणि दीव, मिझोराम, ओदिशा आणि सिक्कीम या सहा राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार यादीचे वार्षिक विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (एसएसआर) करण्यात येणार असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने गुरुवारी जाहीर केले.

या मोहिमेंतर्गत पात्र मतदारांची नोंदणी करण्यावर, विशेषतः तरुण आणि प्रथमच मतदान करणाऱ्या मतदारांचा समावेश करण्यावर भर दिला जाणार आहे. तसेच २०२७ मध्ये १ एप्रिल, १ जुलै आणि १ ऑक्टोबर रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करून मतदानास पात्र ठरणाऱ्या नागरिकांना आगाऊ अर्ज करण्याची सुविधाही दिली जाणार आहे.

या प्रक्रियेअंतर्गत प्रारूप मतदार यादी ३० नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली जाणार असून, अंतिम मतदार यादी २१ जानेवारी २०२७ रोजी प्रकाशित होईल.

आधार ऐच्छिकच

नमुना अर्ज ६ आणि ८ मध्ये आधार क्रमांक देणे ऐच्छिकच राहणार आहे. आधार क्रमांक नाही म्हणून मतदार नोंदणी अर्ज फेटाळता येणार नाही किंवा मतदार यादीतील नोंद वगळता येणार नाही, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

गोकुळचा वाद शिगेला! 'गोकुळ'ला 'अमूल'च्या घशात घालण्याचे षडयंत्र - सतेज पाटील; कोल्हापुरात सोमवारी ‘संघर्ष मोर्चा’

FDA च्या कारवाईला डिजिटल पुराव्यांचे बळ; आठ ते नऊ महिन्यांत नवी यंत्रणा

‘एसटी’ कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी गोड; १० हजार रुपयांचा बोनस जाहीर

पदसंख्या १६ हजार करा! MPSC उच्चस्तरीय समितीची शिफारस

Mumbai : बोरिवली बांधकामप्रकरणी दोन अधिकारी कचाट्यात