राष्ट्रीय

पाकिस्तानमध्ये आत्मघातकी स्फोटात सहा चिनी नागरिक ठार

शांगला जिल्ह्यातील बिशम परिसरात हा हल्ला करण्यात आला. इस्लामाबाद येथून येणारी बस कोहिस्तान येथे जात होती. तेव्हा समोरून येणाऱ्या स्फोटकांनी भरलेल्या वाहनाने बसला जोरदार धडक दिली. त्यामध्ये काही प्रवासी जखमी झाले आहेत, असे पोलिसांनी सांगितले.

Swapnil S

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या अशांत खैबर पख्तुनख्वा प्रांतात मंगळवारी स्फोटकांनी भरलेल्या वाहनाने बसला दिलेल्या धडकेत चीनमधील सहा नागरिक ठार झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. चीनचे हे नागरिक दासू जलविद्युत प्रकल्पामध्ये काम करीत होते.

शांगला जिल्ह्यातील बिशम परिसरात हा हल्ला करण्यात आला. इस्लामाबाद येथून येणारी बस कोहिस्तान येथे जात होती. तेव्हा समोरून येणाऱ्या स्फोटकांनी भरलेल्या वाहनाने बसला जोरदार धडक दिली. त्यामध्ये काही प्रवासी जखमी झाले आहेत, असे पोलिसांनी सांगितले. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही.

हा आत्मघातकी स्फोट होता. संबंधित अधिकारी घटनास्थळावरून पुरावे गोळा करीत आहेत. या परिसराला वेढा घालण्यात आला असून मृतदेह रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. स्फोटकांनी भरलेले वाहन कुठून आले आणि नेमका हल्ला कसा घडला याचा तपास सुरू आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. पाकिस्तानात सुरू असलेल्या विविध प्रकल्पांमध्ये चीनमधील हजारो नागरिक काम करीत आहेत.

पाकिस्तानची पुन्हा पोलखोल! ऑपरेशन सिंदूरमध्ये F-16 सह ४ ते ५ लढाऊ विमाने भारताने पाडली; भारतीय हवाई दल प्रमुखांचा मोठा खुलासा

पिंपरी-चिंचवड : खेळता खेळता चुकून लिफ्टमध्ये गेला अन् अडकला; ११ वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

SRA चा कॉर्पस फंड १ लाख! झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाचा प्रस्ताव; इमारतींच्या उंचीप्रमाणे रकमेत होणार वाढ

डायग्नोस्टिक लॅब्ससाठी नवीन कायदा; चाचण्यांची अचूकता व विश्वासार्हता राखण्यासाठी सरकारचे पाऊल

...तर ओला, उबरवर कारवाई