राष्ट्रीय

बेळगावी येथे कारच्या धडकेत सहा ठार

पार्क केलेल्या वाहनाजवळ उभ्या असलेल्या दोघांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले

Swapnil S

बेळगावी : बेळगावी येथे दत्त जांबोटी मार्गावर कारचालकाचा ताबा सुटल्याने त्याने पार्क केलेल्या दुचाकीला दिलेल्या धडकेमध्ये सहा जण ठार झाले. शुक्रवारी ही घटना घडली. यात पाच जण जागीच ठार झाले तर एकाचा रुग्णालयात उपचाराच्यावेळी मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कार पार्क केलेल्या दुचाकीला आणि त्यानंतर दुसऱ्या दुचाकीला धडकल्याने हा अपघात झाला.

पार्क केलेल्या वाहनाजवळ उभ्या असलेल्या दोघांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी हणमंत मलप्पा मल्यागोळ यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. एकनाथ भीमप्पा पडतरी (२२), मल्लिकार्जुन रामाप्पा मराठे (१६), आकाश रामाप्पा मराठे (१४), लक्ष्मी रामाप्पा मराठे (१९) आणि नागापा लक्ष्मण यादवन्नावर (४८) अशी अन्य मृतांची नावे आहेत. याप्रकरणी मुरगोड पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे. बेळगावी जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक भीमाशंकर गुलेद यांनी सांगितले की, गेल्या तीन दिवसांत जिल्ह्यात रस्ते अपघातात २५ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे त्यांनी लोकांना वाहतुकीचे नियम पाळा, वेग टाळा आणि जीव वाचवा, असे आवाहन केले आहे.

हरिनामाच्या गजराने विठ्ठलाची पंढरी दुमदुमली! पंढरीत १५ लाखांवर वैष्णवांची मांदियाळी; आषाढी एकादशीचा आज मुख्य सोहळा !

महागड्या शक्तिपीठ महामार्गाला आमचा विरोध; सुप्रिया सुळे यांचे ठाम प्रतिपादन

आवाज मराठीचाच! उद्धव-राज ठाकरे तब्बल २० वर्षांनंतर एकाच मंचावर; राज्यभरातील मराठी माणसांमध्ये आनंदाचे वातावरण

डोममध्ये रंगला झिम्मा; शर्मिला ठाकरे, सुषमा अंधारे यांची फुगडी

देशात गरीबांची संख्या वाढणे ही चिंता वाढवणारी बाब; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन