राष्ट्रीय

सोनिया गांधी यांच्या स्वीय सचिवांवर बलात्काराचा आरोप

महिलेच्या तक्रारीनुसार, तिचा पती काँग्रेस कार्यालयात होर्डिंग लावण्याचे काम करत होता.

वृत्तसंस्था

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या स्वीय सचिवांवर बलात्काराचा आरोप झाला आहे. याप्रकरणी दिल्लीच्या उत्तम नगर पोलिस ठाण्यात रविवारी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ‘सोनियांचे खासगी सचिव पी. पी. माधवन यांनी आपल्यावर लग्न व नोकरीचे आमिष दाखवून बलात्कार केला’, असे पीडित दलित महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

महिलेच्या तक्रारीनुसार, तिचा पती काँग्रेस कार्यालयात होर्डिंग लावण्याचे काम करत होता. दोन वर्षांपूर्वी त्याचे निधन झाले. त्यानंतर तिने नोकरीसाठी माधवन यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर ते एकमेकांच्या संपर्कात आले.

महिलेची ओळखतो, पण

आरोप चुकीचे - माधवन

महिलेने माधवन यांच्यावर लग्न व नोकरीचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. पण माधवन यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे. मी महिलेला ओळखतो. पण तिने केलेले आरोप धादांत खोटे आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.

महिलेचा माधवन

यांच्याशी अनेकदा संवाद

२१जानेवारी २०२२ रोजी माधवन यांनी पहिल्यांदा महिलेला आपल्या घरी बोलावले. त्यावेळी त्यांनी तिला आपण घटस्फोटीत असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांची अनेकदा भेट झाली. त्यात माधवन यांनी महिलेवर अनेकदा जबदरस्ती केली, असे या एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे.

देशात मतदार यादीची झाडाझडती; केंद्रीय निवडणूक आयोगाची तयारी

मद्य परवान्यावरून सरकारचा सावध पवित्रा; विधिमंडळाला विश्वासात घेतल्याशिवाय परवाने वाटप नाहीच -अजित पवार

अंतराळवीर शुभांशू शुक्ला आज पृथ्वीकडे परतणार

जनसुरक्षा कायदा ‘अर्बन नक्सल’विरोधात उपयुक्त ठरेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

विरोधी पक्षनेतेपदासाठी ‘फिल्डिंग’; काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये जोरदार रस्सीखेच, 'ही' नावे चर्चेत