राष्ट्रीय

स्टील निर्यात जानेवारीमध्ये १८ महिन्यांच्या उच्चांकावर

स्टीलमिंट डेटानुसार, जानेवारी २०२३ मध्ये स्टीलची आऊटबाऊंड शिपमेंट ०.६७ दशलक्ष टन झाली होती.

Swapnil S

नवी दिल्ली : युरोपियन युनियनकडून वाढलेली मागणी आणि जागतिक किमतीत वाढ यांच्यामुळे भारताची मासिक पोलाद निर्यात जानेवारी २०२४ मध्ये १८ महिन्यांच्या उच्चांकावर ११.१ दशलक्ष टन झाली, असे स्टीलमिंटने म्हटले आहे. याशिवाय, स्टीलच्या स्पर्धात्मक देशांतर्गत किमतींमुळे निर्यातीत वाढ झाली, असे संशोधन संस्थेने आपल्या ताज्या अहवालात म्हटले आहे.

स्टीलमिंट डेटानुसार, जानेवारी २०२३ मध्ये स्टीलची आऊटबाऊंड शिपमेंट ०.६७ दशलक्ष टन झाली होती. निर्यातीतील वाढीमागील कारणांबद्दल, युरोपियन युनियन (इयू) कडून झालेल्या उत्तम मागणीने जानेवारीमध्ये १.११ एमटी (निर्यात) होऊन ६७ टक्के झाली. गेल्या १८ महिन्यांतील ती सर्वाधिक होती. भारताच्या व्यापार विभागात हॉट रोल्ड कॉइलची (एसआरसी) किंमत ५४,३०० रुपये/प्रति टन असताना, जागतिक दर ७१० अमेरिकन डॉलर्स प्रति टन (सुमारे ५८ हजार रुपये) होता, असे स्टीलमिंटने सांगितले. जागतिक बाजारपेठेतील भारतीय पोलादाच्या मागणीत वाढ झाल्याने भारताच्या निर्यातीत वाढ झाली. एकंदरीत, चिनी लुनार सुट्ट्या आणि व्हिएतनाममधील टेट सणामुळे जागतिक व्यापारात घट होऊन भारतीय पोलाद निर्यात नजीकच्या काळात किंचित कमी होऊ शकते, स्टीलमिंटने म्हटले आहे.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी