File Photo 
राष्ट्रीय

‘वागीर’ पाणबुडीच्या समुद्रात चाचण्या सुरू

ही पाणबुडी युद्धात काम करू शकते. हेरगिरी करणे, पाणसुरुंग बसवणे, विशिष्ट भागात टेहळणी करणे आदी कामे ही करू शकते

नवशक्ती Web Desk

भारतीय नौदलाच्या ‘वागीर’ पाणबुडीच्या समुद्रात चाचण्या सुरू झाल्या आहेत. या चाचण्या केल्यानंतर पुढील वर्षी ती नौदलात सामील होणार आहे.

ही पाणबुडी जहाजविरोधी क्षेपणास्त्र व टार्पेडोने सक्षम आहे. ही पाणबुडी शत्रूच्या रडारवर दिसत नाही. या पाणबुडीचे २० एप्रिल २०२२ मध्ये माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडच्या कान्होजी आंग्रे वेट बेसिनमधून अनावरण करण्यात आले.

वागीरची वैशिष्टये

ही पाणबुडी युद्धात काम करू शकते. हेरगिरी करणे, पाणसुरुंग बसवणे, विशिष्ट भागात टेहळणी करणे आदी कामे ही करू शकते. ही पाणबुडी २२१ फुट लांब असून २१ मीटर उंच आहे. ही पाणबुडी पाण्यावरून २० किमी प्रति तास व पाण्याच्या आत ४० किमी प्रति वेगाने चालू शकते.

शहापूर : खालापूरच्या धर्तीवर खुटघर इंटरचेंजचा विकास; मंत्रालय स्तरावर घडामोडी सुरू

पूरग्रस्तांना मदतीचा हात! राज्य शासनाकडून मृतांच्या वारसांना प्रत्येकी ४ लाखांची मदत

लडाखमधील हिंसाचारानंतर सोनम वांगचुक CBI च्या रडारवर; NGO ची चौकशी सुरू, संस्थेचा परवाना रद्द

मराठा समाज बांधवांना तूर्तास दिलासा; हैदराबाद गॅझेटविरोधातील जनहित याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार

मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देणे थांबवा; कुणबी समाजाची मागणी