नवी दिल्ली : आम आदमी पक्षाच्या (आप) दिल्लीतील मुख्यालयावर सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने 'झाडू मारला' आहे. पक्षाची दिल्लीतील राऊस ॲव्हेन्यूवरील मुख्यालयाची जागा म्हणजे अतिक्रमण असल्याचे सांगत ती येत्या १५ जूनपर्यंत रिकामी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
ती जागा दिल्ली उच्च न्यायालयाला विस्तारित कक्ष सुरू करण्यासाठी दिली असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. तसेच 'आप'ने कार्यालयाची जागा मिळवण्यासाठी केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या भूमी आणि विकास कार्यालयाकडे मागणी करावी, असेही न्यायालयाने म्हटले आहे.