औषधांच्या दरवाढीवर ‘सर्वोच्च’ संताप; ‘कॅन्सर’ औषधांच्या १० पट जास्त नफा कमावण्यावर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
राष्ट्रीय

औषधांच्या दरवाढीवर ‘सर्वोच्च’ संताप; ‘कॅन्सर’ औषधांच्या १० पट जास्त नफा कमावण्यावर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे

कर्करोगाच्या (कॅन्सर) औषधांवर रुग्णालये आणि औषध कंपन्यांकडून तब्बल १० पट जास्त नफा लावला जात असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने तीव्र संताप व्यक्त केला आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : कर्करोगाच्या (कॅन्सर) औषधांवर रुग्णालये आणि औषध कंपन्यांकडून तब्बल १० पट जास्त नफा लावला जात असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने तीव्र संताप व्यक्त केला आहे. ‘हा निव्वळ रक्ताचा खेळ आहे’, असे कडक शब्दांत सुनावत न्यायालयाने सर्व प्रकारच्या औषधांवर १५-१६ टक्के एकसमान नफा (मार्जिन) निश्चित करण्याची सूचना केली आहे. न्यायालयाने केंद्र सरकारला या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.

एका कर्करोगाच्या औषधाची किंमत व्यापाऱ्यांना (किरकोळ विक्रेत्यांना) फक्त २,७०० रुपयांना पडते, तरीही कॉर्पोरेट रुग्णालये रुग्णांकडून त्यावर २७,००० रुपयांचे एमआरपी आकारतात, यावर न्यायालयाने तीव्र आक्षेप घेतला.अशा महागड्या औषधोपचारांमुळे आणि सरकारी योजनांच्या माध्यमातून होणाऱ्या भरपाईमुळे शेवटी सामान्य करदात्याचेच नुकसान होत असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. अनेक कॉर्पोरेट रुग्णालये केवळ त्यांच्याच किंवा त्यांनी सुचवलेल्या विशिष्ट फार्मसीमधून औषधे खरेदी करण्याची सक्ती करतात, यावरही न्यायालयाने चिंता व्यक्त केली. बाहेरून औषध आणल्यास उपचारांची हमी दिली जात नाही, असा प्रकार सुरू असल्याचे सांगण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने सर्व औषधांच्या एमआरपीवर एकसमान १६ टक्के नफा ठेवण्याचा सल्ला दिला असून, या प्रकरणावर केंद्र सरकारचे उत्तर मागवले आहे.

या प्रकरणाची सुनावणी १२ ऑक्टोबर रोजी निश्चित करण्यात आली असून, तोपर्यंत यावर योग्य ती माहिती घेऊन उत्तर सादर करण्यास सॉलिसिटर जनरल यांना दोन आठवड्यांचा वेळ देण्यात आला आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

'त्या' तालुक्यांनाही मदत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली ग्वाही

टाटा कोणाला करणार ‘टाटा’?

आजचे राशिभविष्य, ३० सप्टेंबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

रोज सनस्क्रीन लावता? मग 'या' चुका करणं लगेच थांबवा

SIR विरोधात ठाकरे बंधूंचा एल्गार; CJP च्या आंदोलनाला पाठिंबा, ४ ऑक्टोबरला मुंबईत संयुक्त मोर्चा