राष्ट्रीय

स्वांते पाबो यांना वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पारितोषिक जाहीर

वृत्तसंस्था

स्वीडनच्या स्वांते पाबो यांना वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पारितोषिक जाहीर झाले आहे. मानवी उत्क्रांतीच्या अनुवांशिकतेसंदर्भातील अभ्यासासाठी त्यांचा हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. नोबेल समितीचे सचिव थॉमस पर्लमन यांनी याबाबतची घोषणा केली.

पाबो हे पॅलेओजेनेटीक्सच्या संस्थापकांपैकी एक आहेत. त्यांनी निएंडरथल जीनोमवर मोठ्या प्रमाणावर काम केले आहे. ते जर्मनीतील लीपझिंग येथील मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर इव्होल्यूशनरी एन्थ्रोपोलॉजी येथील जेनेटिक्स विभागाचे संचालकही होते.

स्वांते पाबो यांनी एका नामशेष होमिनिनचा शोध लावला. द डेनिसोवा, एका लहान बोटाच्या हाडाच्या नमुन्यातून त्यांनी डेटा गोळा केला. या आता नामशेष झालेल्या होमिनिनपासून होमो सेपियन्समध्ये जनुकांचे हस्तांतरण झाले आहे, असे स्वांते पाबो यांना आढळले होते. त्यांच्या अग्रगण्य संशोधनाद्वारे स्वांते पाबो यांनी अशक्य वाटणारी गोष्ट साध्य केली. सर्व जिवंत मानवांना विलुप्त होमिनिन्सपासून वेगळे करणार अनुवांशिक फरक उघड करून, त्यांनी संपूर्णपणे नवीन सायंटिफिक डिसिप्लिन, पॅलिओजेनोमिक्स प्रस्थापित केले आहे.

गेल्या वर्षीचे वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पारितोषिक डेव्हिड ज्युलियस आणि आर्डेन पेटामूटियम यांना देण्यात आले होते. या दोन्ही संशोधकांना शरीराचे तापमान, दाब आणि वेदना या रिसेप्टर्सचा शोध लावल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला होता.

जगातील प्रतिष्ठेचा पुरस्कार

नोबेल पारितोषिक हा जगातील अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार मानला जातो. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नोबेल पुरस्कारांची घोषणा होते. स्वीडिश वैज्ञानिक ‘अल्फ्रेड नोबेल’ने आपल्या मृत्यूपत्रात या पुरस्कारांची तरतूद केली. यंदा वैद्यकीय क्षेत्रातल्या नोबेल पुरस्काराने नोबेल पुरस्कार वितरण सोहळ्याची सुरुवात झाली आहे. यानंतर मंगळवारी भौतिकशास्त्र विषयात संशोधन करणाऱ्या व्यक्तिला नोबेल पुरस्कार देण्यात येईल. बुधवारी रसायनशास्त्र आणि गुरुवारी साहित्य क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तिला नोबेल पुरस्कार देण्यात येणार आहे. २०२२चा नोबेल शांतता पुरस्कार शुक्रवारी देण्यात येणार आहे. तर अर्थशास्त्र विषयाचा नोबेल पुरस्कार १० ऑक्टोबर रोजी जाहीर केला जाईल.

"तर पवारांची औलाद सांगायचो नाही..." उदयनराजेंच्या प्रचारसभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले?

पश्चिम महाराष्ट्रात कोणाचा गुलाल? मतदारांमध्ये उत्सुकता, मुद्यांवरून गुद्यांवर चर्चा

"अपना टाईम भी आयेगा" म्हणत बिचुकलेंनी सांगितले कल्याण मतदारसंघ निवडण्याचे कारण

Youtuber Elvish Yadav: एल्विश यादवला आणखीन एक झटका, मनी लॉन्ड्रिंगचा खटला दाखल, ED करणार चौकशी!

दोन्ही हात नसतानाही मिळवलं ड्रायव्हिंग लायसन्स, तमिळनाडूच्या तरूणानं कशी साधली किमया?