सागरी अन्न प्रक्रिया कारखान्यात अमोनिया वायू गळती; तमिळनाडूत ७ महिला कामगारांचा मृत्यू, अनेकांची प्रकृती गंभीर Photo : X
राष्ट्रीय

सागरी अन्न प्रक्रिया कारखान्यात अमोनिया वायू गळती; तमिळनाडूत ७ महिला कामगारांचा मृत्यू, अनेकांची प्रकृती गंभीर

पेरियापालायम जवळील मांजकरणै येथील एका खासगी सागरी अन्न प्रक्रिया युनिटमध्ये अमोनिया वायूची गळती होऊन झालेल्या दुर्घटनेत ७ महिलांचा मृत्यू झाला असून ६७ जण जखमी झाले आहेत, अशी माहिती तिरुवल्लूरच्या जिल्हाधिकारी एस. कविता यांनी रविवारी सांगितले.

Krantee V. Kale

तिरुवल्लूर (तमिळनाडू) : पेरियापालायम जवळील मांजकरणै येथील एका खासगी सागरी अन्न प्रक्रिया युनिटमध्ये अमोनिया वायूची गळती होऊन झालेल्या दुर्घटनेत ७ महिलांचा मृत्यू झाला असून ६७ जण जखमी झाले आहेत, अशी माहिती तिरुवल्लूरच्या जिल्हाधिकारी एस. कविता यांनी रविवारी सांगितले. ४६ जणांवर वेल्स रुग्णालयात आणि २१ जणांवर व्यंकटेश्वर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यापैकी अत्यंत गंभीर नऊ रुग्णांना रुग्णवाहिकेद्वारे चेन्नई येथील शासकीय स्टेनली वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

आम्ही एकूण ४४ रुग्णांना दाखल केले असून, यात ४३ तरुण महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. यापैकी १५ ते १६ रुग्णांना ‘इंट्युबेट’ करण्यात आले आहे, तर ११ रुग्ण सध्या व्हेंटिलेटर सपोर्टवर आहेत," असे डॉक्टरांनी पत्रकारांना सांगितले.

जिल्हाधिकारी कविता यांनी कारखान्याला भेट देऊन मदतकार्याचा आढावा घेतला. तसेच रुग्णांची विचारपूस केली. या निर्यात युनिटमधील संभाव्य सुरक्षा त्रुटींची चौकशी करण्यासाठी अधिकृत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

ठाण्यात उद्या ‘थर’थराट; दहीहंडीनिमित्त ठाण्यात कडेकोट बंदोबस्त, २३०७ पोलीस तैनात

Dombivli : एटीएम कार्डची चोरी करून रोकड काढली; दोघांना अटक

राज्याच्या 'विधि व न्याय' विभागाच्या सचिवांना HC चा दणका; बजावली अवमान नोटीस, माफीनामाही फेटाळला

Raigad : अट्टल केमिकल तस्कर अश्रफ खान अटकेत; टँकरमधून केमिकल चोरून ड्रममध्ये भरणारे ताब्यात

नवी मुंबई विमानतळावरून ३० लाख प्रवाशांचा प्रवास; ४६ शहरांशी हवाई जोडणीचा विस्तार