तरुण तेजपाल गोवा न्यायालयात शरण; १० वर्षांच्या कारावासासाठी रवानगी (संग्रहित छायाचित्र)
राष्ट्रीय

तरुण तेजपाल गोवा न्यायालयात शरण; १० वर्षांच्या कारावासासाठी रवानगी

तहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांनी २०१३ च्या लैंगिक अत्याचार प्रकरणात १० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा भोगण्यासाठी सोमवारी गोवा न्यायालयात आत्मसमर्पण केले.

Swapnil S

पणजी : तहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांनी २०१३ च्या लैंगिक अत्याचार प्रकरणात १० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा भोगण्यासाठी सोमवारी गोवा न्यायालयात आत्मसमर्पण केले.

२५ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाने तेजपाल यांना तीन आठवड्यांच्या आत शरण येण्याचे निर्देश दिले होते. सर्वोच्च न्यायालयाचे न्या. आलोक अराधे यांच्या खंडपीठाने शरण येण्यापासून सूट देण्याची त्यांची याचिका फेटाळून लावली होती. त्यानंतर तेजपाल यांनी म्हापसा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात आत्मसमर्पण केले. तेथून त्यांना उत्तर गोव्यातील कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृहात पाठवण्यात आले. उच्च न्यायालयाच्या ५ ऑगस्ट रोजीच्या शिक्षेला आव्हान देणाऱ्या त्यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय २२ सप्टेंबर रोजी सुनावणी करणार आहे; मात्र त्यापूर्वी आत्मसमर्पणाचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे.

प्रकरण काय?

मुंबई उच्च न्यायालयाने ६ ऑगस्ट रोजी तरुण तेजपाल यांना २०१३ मध्ये गोव्यातील एका कार्यक्रमादरम्यान हॉटेलच्या लिफ्टमध्ये महिला सहकाऱ्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दोषी ठरवले आणि १० वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. यापूर्वी सत्र न्यायालयाने त्यांची केलेली सुटका उच्च न्यायालयाने रद्द केली. उच्च न्यायालयाने तेजपाल यांना १० लाख रुपयांहून अधिक दंड ठोठावला असून ही रक्कम पीडितेला देण्याचे निर्देश दिले आहेत.

सुप्रीम कोर्टात याचिका

दरम्यान, उच्च न्यायालयाने सुनावलेली १० वर्षांची शिक्षा पुरेशी नसून या गुन्ह्याचे गांभीर्य पाहता तेजपाल यांना जन्मठेपेची शिक्षा व्हावी, यासाठी गोवा सरकारने सर्वोच्च न्यायालयात वेगळी याचिका दाखल केली आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Maratha Reservation : मनोज जरांगेंची आज मुंबईकडे कूच; आझाद मैदानावर एकटेच उपोषण करणार

महागाई भडकली! घाऊक महागाईचा दर ९.९२ टक्क्यांवर; किरकोळ महागाई ४.८२ टक्क्यांवर, अन्न, इंधन आणि उत्पादित वस्तू महागल्या

राज्य सरकार हिवाळी अधिवेशनात UCC विधेयक मांडण्याच्या तयारीत - देवेंद्र फडणवीस

संस्कृती आणि भाषांच्या संवर्धनातूनच ‘सांस्कृतिक राष्ट्रवाद’ मजबूत होईल; अखिल भारतीय राजभाषा संमेलनात अमित शहा यांचे प्रतिपादन

‘एस-४००’ ने ३१४ किमीवरील पाकिस्तानी विमान पाडले; संरक्षण खात्याच्या ताज्या अहवालात उघड