राष्ट्रीय

निवडणूक आयोगाने शिवसेनेला कागदपत्रे सादर करण्यासाठी दिली दोन आठवड्यांची मुदत

वृत्तसंस्था

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे मोठ्या अडचणीत सापडले आहेत. शिंदे यांनी शिवसेनेवरही दावा केला आहे. महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा वाद सुप्रीम कोर्टात तर शिवसेनेवरील वर्चस्वाचा वाद निवडणूक आयोगाकडे गेला आहे. यापूर्वी, केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेला कागदपत्रे सादर करण्यासाठी दिलेली चार आठवड्यांची मुदत दिली होती. मात्र, आता आयोगाने ही मुदत दोन आठवड्यांवर आणली आहे.त्यामुळे उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा धक्का बसला आहे.

निवडणूक चिन्हाबाबत कागदपत्रे सादर करायला शिवसेनेने निवडणूक आयोगाकडे ४ आठवड्यांची मुदत मागितली होती. ही मुदत आयोगाने दिल्याचे दोन दिवसांपूर्वीच जाहीर झाले होते. पण आता ४ आठवड्यांची मुदत आयोगाने फेटाळली असून ठाकरे गटाला दोन आठवड्यांची म्हणजे २३ ऑगस्टपर्यंत कागदपत्रे सादर करण्याची मुदत दिली आहे. सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीमध्ये निवडणूक आयोगाकडे शिंदे गटाने दाखल केलेल्या तक्रारीवर शिवसेनेने आक्षेप घेतले होते. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला कोणताही निवडणूक चिन्हाबाबत मोठा निर्णय घेऊ नये, असे स्पष्ट बजावले होते.

निवडणूक आयोगाने प्रथम शिंदे गट आणि शिवसेना यांना त्यांच्या दाव्यासंबंधीची कागदपत्रे सादर करायला ८ ऑगस्टपर्यंतची वेळ दिली होती. पण सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीनंतर ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे कागदपत्रे सादर करायला चार आठवड्यांचा वेळ मागितला होता.

T20 World Cup साठी टीम इंडियाची घोषणा: पंत, यशस्वी, चहल, दुबेला संधी; रिंकू, गील राखीव खेळाडूंमध्ये

शिंदे गटाची खेळी; महिन्याभरापूर्वी आलेल्या रवींद्र वायकरांना उत्तर-पश्चिम मुंबई मतदारसंघातून उमेदवारी

प्रवाशांना ‘बेस्ट’ दरवाढीचा झटका? साध्या बसचे किमान तिकीट ७ रुपये; AC बसचे १० रुपये होणार

किरकोळ कारणावरून प्रवाशाला लोकलमधून ढकलले, एक हात निकामी

नाशिकमधून शिंदेंची वेगळी खेळी! थेट शांतीगिरी महाराजांनाच उमेदवारी, गोडसेंना धक्का