राष्ट्रीय

एमआयटी डब्ल्यूपीयूच्या टीमचा राष्ट्रीय गौरव

वृत्तसंस्था

भारतातील सर्वात मोठ्या मशीन टूल प्रदर्शनात एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या संशोधक प्राध्यापक संघाने राष्ट्रीय पातळीवर यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ दा. कराड आणि कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

इंडियन मशीन टूल मॅन्युफॅक्चरॅर्स असोसिएशन इंडिया तर्फे आयोजित इमटेक्स फॉर्मिंग २०२२ आणि टुलटेक २०२२ ही प्रदर्शनी नुकतीच बंगळुरू येथे झाली. यामध्ये एमआयटी डब्ल्यूपीयूचे संशोधक प्राध्यापक टीम मधील यंत्र अभियांत्रिकी संकुुल प्रमुख प्रा.डॉ. गणेश काकांडीकर यांच्या नेतृत्वाखालील सहाय्यक प्रा.डॉ. अनिल माशाळकर आणि सहाय्यक प्रा ओंकार कुलकर्णी यांच्या संघाने मायक्रो फॉर्मिंगे या क्षेत्रातील संशोधनासाठी हा गौरव प्राप्त केला आहे. या वेळी इंडियन मशीन टूल मॅन्युफॅक्चरॅर्स असोसिएशन इंडियाचे अध्यक्ष रवी राघवन आणि उपाध्यक्ष राजेंद्र राजमाने यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन संघाचा गौरव केला.

एरोस्पेस क्षेत्रासाठी वापरातील टायटॅनियम या धातूच्या शंभर मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या पत्र्याच्या फॉर्मबिलिटी अॅनालिसिस करण्यात आला. विद्यापीठातील एरोस्पेस रिसर्च अ‍ॅड डेव्हलपमेंट बोर्ड डीआरडीओ प्रायोजित मायक्रोफॉर्मिंग रिसर्च सेंटर येथे हे संशोधन करण्यात आले आहे. संपूर्ण भारतातील सहभागी संघातून त्रिस्तरीय मूल्यमापनातून सर्वोत्तम पाच संघाची निवड करण्यात आली होती. त्यात महाराष्ट्रातील एकमेव संघाचा समावेश आहे. या यशासाठी संघाचे अभिनंदन माईर्सचे संस्थापक व सह व्यवस्थापकीय विश्वस्त प्रा. प्रकाश जोशी, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रसाद खांडेकर यांनी केल

मुंबईत आज महायुती, मविआच्या सभा; मोदी-राज एका व्यासपीठावर, बीकेसीत उद्धव, पवार, केजरीवालांची उपस्थिती

...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही, सुप्रीम कोर्टाने केले स्पष्ट

भारतीय फुटबॉलचा तारा 'सुनील छेत्री'चा अलविदा! ६ जून रोजी खेळणार शेवटची लढत

‘आज जागतिक उच्च रक्तदाब दिन’; ३४ टक्के मुंबईकर ब्लडप्रेशरचे शिकार!

रोहितचा मुंबई इंडियन्ससाठी आज अखेरचा सामना? लखनऊविरुद्ध हंगामाचा शेवट गोड करण्याचे ध्येय