राष्ट्रीय

जगातील टॉप-१० श्रीमंतांच्या संपत्तीत झाली घट

जेफ बेझोस, वॉरेन बफे, मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांचेही मोठे नुकसान झाले

वृत्तसंस्था

जगातील टॉप-१० श्रीमंतांसाठी शुक्रवारचा दिवस वाईट ठरला आणि त्यांच्या संपत्तीत घसरण झाली. इलॉन मस्क यांना सर्वाधिक नुकसान झाले आहे, त्यांची एकूण संपत्ती गेल्या २४ तासांत १४ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. याशिवाय जेफ बेझोस, वॉरेन बफे, मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांचेही मोठे नुकसान झाले आहे.

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्ला आणि स्पेसएक्स कंपनीचे मालक इलॉन मस्क यांची संपत्ती १४ अब्ज डॉलरवरून २०३ अब्ज डॉलर्स झाली आहे. याशिवाय अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनाही गेल्या २४ तासांत ४.२० अब्ज डॉलरचे नुकसान झाले असून या घसरणीसह त्यांची संपत्ती १२७ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे.

अर्नॉल्ट आणि बिल गेट्सचे मोठे नुकसान

या घसरणीच्या काळात टॉप-१०यादीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या बर्नार्ड अरनॉल्टची एकूण संपत्ती ३८. कोटी डॉलर्सने घसरुन १२२ अब्ज डॉलर्स झाली आहे. तर मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स यांची एकूण संपत्ती १.७३ अब्ज डॉलरने घसरून ११२ अब्ज डॉलर्स झाली आहे. या कालावधीत यादीत पाचव्या क्रमांकावर असलेले लॅरी पेज यांची संपत्ती २.९९ ​​अब्ज डॉलरने घसरून ९७.१ अब्ज डॉलर्स झाली आहे.

अंबानी-अदानी यांची संपत्ती घटली

टॉप-१० श्रीमंतांच्या यादीत समाविष्ट असलेले मुकेश अंबानी आणि गौतम अदानी या दोन्ही भारतीय उद्योगपतींचेही मोठे नुकसान झाले आहे. अंबानींची संपत्ती १.४०अब्ज डॉलरने घसरून ९२.९ अब्ज डॉलर्स झाली, तर गौतम अदानी यांची संपत्ती २.१९ अब्ज डॉलरने घसरून ९२.७ अब्ज डॉलर्स झाली.

अन्य अब्जाधीशांच्या संपत्तीत घट

सहाव्या क्रमांकाचे दिग्गज गुंतवणूकदार वॉरेन बफे यांच्यासाठी शुक्रवारचा दिवसही वाईट ठरला, त्यांच्या संपत्तीत ३.४३ अब्ज डॉलरची घट झाली. त्यानंतर, बफे यांची एकूण संपत्ती ९३.४ अब्ज डॉलर्सवर आली. सातव्या क्रमांकावर असलेल्या सग्रे ब्रिनची संपत्ती २.८२ अब्ज डॉलरने घसरून ९३.१ अब्ज डॉलर्स झाली, तर १०व्या क्रमांकावर असलेल्या स्टीव्ह बाल्मरची २.१९ अब्ज डॉलरची घट झाली आणि त्यांची एकूण संपत्ती ८७.७ अब्ज डॉलर्स झाली.

देशात मतदार यादीची झाडाझडती; केंद्रीय निवडणूक आयोगाची तयारी

मद्य परवान्यावरून सरकारचा सावध पवित्रा; विधिमंडळाला विश्वासात घेतल्याशिवाय परवाने वाटप नाहीच -अजित पवार

अंतराळवीर शुभांशू शुक्ला आज पृथ्वीकडे परतणार

जनसुरक्षा कायदा ‘अर्बन नक्सल’विरोधात उपयुक्त ठरेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

विरोधी पक्षनेतेपदासाठी ‘फिल्डिंग’; काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये जोरदार रस्सीखेच, 'ही' नावे चर्चेत