राष्ट्रीय

भारतात प्रवासी वाहन पुरवठ्यात झाली मोठ्या प्रमाणात वाढ

जूनमध्ये प्रवासी वाहनांचा डीलर्सला होणारा पुरवठा २,७५,७८८ युनिटस‌् इतका झाला आहे.

वृत्तसंस्था

भारतात प्रवास वाहन पुरवठ्यात जूनमध्ये वाढ झाली. वार्षिक आधारावर जूनमध्ये १९ टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे सेमीकंडक्टरच्या पुरवठ्यात सुधारणा झाल्याचे दिसून येते, असे वाहन उद्योगाची संघटना ‘सियाम’ने म्हटले आहे.

सोसायटी ऑफ इंडियन ॲटोमोबाईल्स मॅन्यूफॅक्चरर्स (सियाम)ने बुधवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार जूनमध्ये प्रवासी वाहनांचा डीलर्सला होणारा पुरवठा २,७५,७८८ युनिटस‌् इतका झाला आहे. जून २०२१ मध्ये २,३१,६३३ युनिटस‌् इतका झाला होता. अशाच प्रकारे दुचाकींचा गाऊक पुरवठ्यातही जूनमध्ये वाढ होत १३,०८,७६४ युनिटस‌् इतका जाला आहे. मागील वर्षी वरील महिन्यात १०,६०,५६५ युनिटस‌् पुरवठा झाला होता. तसेच तीनचाकी वाहनांच्या पुरवठ्यात वाढ होऊन जूनमध्ये २६,७०१ युनिटस‌् झाला आहे. जून २०२१ मध्ये हा पुरवठा ९,४०४ युनिटस‌् इतका झाला होता. त्यामुळे जूनमध्ये सर्व प्रकारच्या वाहनांची विक्री जूनमध्ये वधारुन १६,११,३०० युनिटस‌्ची झाली असून जून २०२१ मध्ये हा आकडा १३,०१,६०२ युनिटस‌् होता.

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणी प्राध्यापक निलंबित; 'त्या' निवेदनावरून संस्थेची माफी

Mumbai : ‘बटरफ्लाय’ रोखणार पाणी गळती; जलवाहिन्यांवर बटरफ्लाय झडपा बसवणार, गणेश खणकर यांच्या मागणीची दखल

Mumbai : चौपाटी, विसर्जनस्थळी चोख व्यवस्थापन; देशभरातील तज्ज्ञांकडून पालिका, पोलिसांचे कौतुक

गणेश विसर्जनासाठी BMC सज्ज; ३८३ कृत्रिम तलावांची व्यवस्था, ६७ नैसर्गिक विसर्जनस्थळांवरही सुविधा, २५ हजार अधिकारी-कर्मचारी तैनात

बार्सिलोनामध्ये ‘गणपती बाप्पा मोरया’; महाराष्ट्र मंडळ स्पेनतर्फे गणेशोत्सव, स्पॅनिश कलाकारांचाही सहभाग