राष्ट्रीय

गुजरातमधील बोट दुर्घटनेप्रकरणी तिघांना अटक

Swapnil S

वडोदरा : वडोदराजवळील हरणी येथे बोट दुर्घटनेत १४ विद्यार्थी आणि दोन शिक्षकांचा बळी गेला होता. त्या प्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तीन जणांना अटक केली आहे.

वडोदरा शहराच्या बाहेरील हरणी तलावात बोट बुडून झालेल्या दुर्घटनेत ९ विद्यार्थी आणि दोन शिक्षकांना वाचवण्यात आले. हे सर्व तेथे सहलीला गेले होते. मात्र या दुर्घटनेमुळे पोलिसांनी कोटिया प्रोजेक्ट्सच्या भागीदारांसह १८ जणांविरुद्ध भारतीय दंडसंहितेच्या कलम ३०४ (दोषी हत्येचा प्रयत्न) आणि ३०८ (दोषी हत्येचा प्रयत्न) अन्वये एफआयआर नोंदविला आहे. कोटिया प्रकल्पाच्या भागीदारांना पालिकेने तलाव करारावर वापरण्यास दिला होता. पोलीस उपायुक्त पन्ना मोमाया यांनी सांगितले की, आम्ही हरणी तलाव झोनचे व्यवस्थापक शांतीलाल सोळंकी आणि नयन गोहिल व अंकित या दोन बोटचालकांना अटक केली आहे. इतर दोषींना पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेत १४ शालेय विद्यार्थी आणि २ महिला शिक्षकांना आपला जीव गमवावा लागला, तर तलावातील बचावकार्य कारवाई गुरुवारी रात्री संपली. दरम्यान, बोट दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या आपल्या मुलांवर गुरुवारी रात्री उशिरा काही कुटुंबीयांनी अंत्यसंस्कार केले. वडोदरा महानगरपालिकेने २०१७ मध्ये कोटिया प्रकल्पांना हरणी लेक झोन, एक मनोरंजन केंद्र चालवण्याचे आणि देखरेखीचे कंत्राट दिले होते. पालिकेचे अभियंता राजेश चौहान यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे की, फर्म, तिचे मालक, व्यवस्थापक आणि बोटचालकांनी अनेक कारणांवर गुन्हेगारी निष्काळजीपणा केला आहे, मग ते बोटींची देखभाल न करणे किंवा जीवन रक्षक उपकरणे आणि लाइफ जॅकेटची पुरेशी संख्या न ठेवणे अशा स्वरूपातील निष्काळजीपणा केला गेला आहे.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस