एक्स @ButtanMunish
राष्ट्रीय

महाकुंभात गर्दीमुळे वाहतूक जाम; भाविक १०-१२ तास अडकले प्रवासात

रविवारची सुट्टी असल्याने महाकुंभात भाविकांची मोठी गर्दी झाली असून, संगमला जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर १० ते १५ किमी लांबपर्यंत वाहतुकीची कोंडी झाली.

Swapnil S

प्रयागराज : रविवारची सुट्टी असल्याने महाकुंभात भाविकांची मोठी गर्दी झाली असून, संगमला जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर १० ते १५ किमी लांबपर्यंत वाहतुकीची कोंडी झाली. वाराणसी, लखनौ, कानपूर आणि रेवा ते प्रयागराज या मार्गांवर वाहने २५ किमीपर्यंत अडकून पडली आहेत. संगमात स्नान करण्यासाठी जाणारे आणि तिथून परतणारे भाविक वाहतूक कोंडीत अडकल्याने तहान व भूकेने व्याकुळ झाले आहेत.

प्रयागराज जंक्शनवरील गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी आपत्कालीन गर्दी व्यवस्थापन योजना लागू करण्यात आली आहे. प्रचंड गर्दीमुळे प्रयागराज संगम स्टेशन बंद करावे लागले. स्नानासाठी येणारे व स्नान केल्यानंतर परतणाऱ्या भाविकांच्या गर्दीमुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

भाविकांच्या बसला अपघात, १२ जण जखमी

दरम्यान, महाकुंभातून मध्य प्रदेशला जाणारी भाविकांनी भरलेली बस रस्त्याच्या कडेला उलटून झालेल्या अपघातात १२ हून अधिक भाविक जखमी झाले. तसेच रविवारी सकाळी मेळा परिसरातील सेक्टर-१९ मध्ये आग लागली. यामध्ये, एक कल्पवासी तंबू जळाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग तत्काळ विझवली.

Maratha Reservation : मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी अखेर आझाद मैदानात; बेमुदत आंदोलनावर ठाम, पावसातही आंदोलकांचा उत्साह कायम

लातूर-नांदेडमध्ये मुसळधार पावसाचा कहर; बचावासाठी लष्कराची मदत, जनजीवन विस्कळीत

...तर मुख्यमंत्र्यांच्या कारकीर्दीला धोका! मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा इशारा

दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप; २९,९६५ गणेशमूर्तीच विसर्जन

...तर भारताचा 'टॅरिफ' कमी करू! व्हाइट हाऊसचे सल्लागार पीटर नवारो यांचे वक्तव्य