राष्ट्रीय

Twitter Blue Tick : ट्विटरच्या ब्लू टिकसाठी मोजावे लागणार एवढे पैसे; ट्विटरची नवी घोषणा

अब्जाधीश इलॉन मस्क यांनी ट्विटरचा ताबा घेतल्यानंतर केले अनेक बदल, (Twitter Blue Tick) अनेकदा चर्चेत राहिले ट्विटर

प्रतिनिधी

जगातील सर्वात मोठे उद्योगपती इलॉन मस्क यांनी काही महिन्यांपूर्वी ट्विटरवर ताबा मिळवला. त्यानंतर ट्विटरमध्ये अनेक बदल करण्यात आले. (Twitter Blue Tick) आता ट्विटरने मोबाईलसाठी ट्विटर ब्लू टिकची सबस्क्रिप्शन किंमत जाहीर केली आहे. आता ब्लू टिकसाठी युझर्सना महिन्याला ११ डॉलर्स म्हणजे अंदाजे ९०० रुपये द्यावे लागणार आहेत. अँड्रॉईड आणि आय फोन दोन्हीसाठी समान किंमत असणार आहे. मासिक शुल्काच्या तुलनेत ट्विटरकडून वेब वापरकर्त्यांसाठी मात्र स्वस्त वार्षिक योजना जाहीर करण्यात आली.

सध्या ट्विटर हा प्रत्येकाच्या दैनंदिन जीवांचा भाग झाला आहे. राजकारणी, प्रसिद्ध व्यक्ती, पत्रकार आणि सार्वजनिक क्षेत्रातल्या महत्त्वाच्या व्यक्तींना ट्विटरकडून ब्लू टिक देण्यात येते. याआधी ही सेवा विनामूल्य होती. इलॉन मस्क हे ट्विटरचे मालक झाल्यानंतर यामध्ये बदल करण्यात आले. ट्विटरच्या ब्लू टिकसाठी सबस्क्रिप्शन फी आकारण्याची घोषणा यापूर्वीच इलॉन मस्क यांनी केली होती. गेल्या काही दिवसांपासून ट्विटरमध्ये होणाऱ्या घडामोडींकडे सर्वांचे लक्ष आहे. कर्मचारी कपात, मस्क यांच्यावर होणारी टीका अशा अनेक चर्चा सध्या सुरु आहेत. यामध्ये आता या निर्णयामुळे वापरकर्त्यांवर काय परिणाम होते? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत