जगातील प्रसिद्ध उद्योजक एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटरची (Twitter Down) सूत्रे हाती घेतल्यानंतर या सोशल मिडिया कंपनीवर चांगलाच परिणाम झालेला दिसत आहे. एकीकडे एलॉन मस्क यांनी कर्मचारी कपातीचा इशारा देण्याचा निर्णय घेतला तर दुसरीकडे ट्विटरकर्त्यांना ट्विटर डाऊनचा त्रास भोगावा लागत आहे. शुक्रवारी सकाळपासून जगभरातील अनेक भागांमध्ये ट्विटर लॉगिन होत नसल्याच्या तक्रारी करण्यात येत आहेत. एलॉन मस्क यांनी कर्मचारी कपातीचा इशारा देताच हा त्याचाच परिणाम असल्याची चर्चा आता रंगली आहे.
ट्वीटर (Twitter Down) मोबाईलवर व्यवस्थित काम करत असले तरी ट्वीटर वेबवर बऱ्याच तांत्रिक अडचणी येत आहेत. अनेकांना ट्वीटरवर पोस्ट करण्यात, रिफ्रेशन करण्यात अडचणी येत आहे. एका तासाहून अधिक काळ अनेकांना या तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ‘डाऊन डिडेक्टर’च्या आकडेवारीनुसार, ९४ टक्के लोकांनी ट्वीटर वेबवर लॉगइनला अडचणी येत असल्याचे सांगितले आहे. तसेच ६ टक्के लोकांना मोबाईलवरुन ट्वीटर पाहण्यात अडचणी येत आहेत.