सांकेतिक छायाचित्र  @carakeshsingh
राष्ट्रीय

हद्दच झाली! थंडी वाजते म्हणून पठ्ठ्यांनी चक्क धावत्या ट्रेनमध्येच शेकोटी केली, धूर बघून खळबळ उडाली; नंतर...

Swapnil S

कडाक्याच्या थंडीपासून बचावासाठी लोक विविध उपाय करतात. काही लोक रूम हीटरचा अवलंब करतात, बरेच लोक इलेक्ट्रिक ब्लँकेट देखील विकत घेतात, तर काही लोक घरात किंवा रस्त्याच्या कडेला शेकोटी पेटवतात. पण, हजारो प्रवाशांनी भरलेल्या धावत्या ट्रेनमध्ये कोणी शेकोटी करेल अशी कल्पना तुम्ही करू शकता का? पण, असाच प्रकार खरोखर घडला आहे.

आसामच्या सिलचल येथून नवी दिल्लीला जाणाऱ्या संपर्क क्रांती एक्स्प्रेस ट्रेनमध्ये ही घटना घडली. जनरल डब्यातील दोन तरुण प्रवाशांनी थंडीपासून वाचण्यासाठी चक्क शेकोटी केली. त्यांनी ट्रेनमध्येच शेणाच्या गोवऱ्या जाळल्या आणि त्यावर हात गरम करत होते. गोवऱ्यांचा धूर ट्रेनमध्ये झाला आणि अचानक सगळीकडे घबराट पसरली.

...म्हणून आम्ही शेकोटी केली -

आग्रापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या बर्हान चमरौला स्टेशनवरच एस्कॉर्ट टीमने जनरल कोचला आग लागल्याची माहिती रेल्वे पोलिसांना दिली. उत्तर प्रदेशातील अलीगढ येथे आरपीएफच्या पथकाने ट्रेन थांबवली असता दोन जणांनी शेकोटी केल्याचे दिसून आले. सुदैवाची बाब म्हणजे यामुळे मोठी दुर्घटना घडली नाही. अलीगढमध्ये आरोपी प्रवाशांची चौकशी करण्यात आली असता "आम्ही फक्त स्वतःला थंडीपासून वाचवण्याचा प्रयत्न करत होतो. म्हणून आम्ही आग लावली" असे त्यांनी सांगितले.

दोघांना झाली अटक -

त्यानंतर गुन्हा दाखल करून दोघांना अटक करण्यात आली. चंदन कुमार आणि देवेंद्र सिंग अशी आरोपी प्रवाशांची नावे आहेत. दोघांचे वय अनुक्रमे 23 आणि 25 वर्षे आहे. हे दोघेही हरियाणातील फरिदाबाद येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. जनरल डब्यात गोवऱ्या जाळल्याच्या घटनेत 14 जणांना चौकशीसाठी ट्रेनमधून उतरवण्यात आले होते, पण नंतर या दोघांशिवाय सर्वांना सोडण्यात आले.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस