राष्ट्रीय

‘यूएई’ने सुवर्णअध्याय रचला - नरेंद्र मोदी; अबुधाबीतील मंदिराच्या उद्घाटनप्रसंगी उद्गार

Swapnil S

अबुधाबी : 'यूएई'ने (संयुक्त अरब अमिरातींनी) आज येथे मानवी इतिहासातील सुवर्णअध्याय लिहिला आहे. कित्येक वर्षांच्या अथक परिश्रमाच्या फलस्वरूप उभ्या राहिलेल्या या सुंदर आणि दैवी मंदिराचे आज उद्घाटन होत आहे. याप्रसंगी भगवान स्वामीनारायण यांचे आशीर्वादही आपल्या पाठीशी आहेत, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भावना व्यक्त केल्या. यूएईतील अबुधाबी येथे मोदी यांच्या हस्ते बुधवारी बीएपीएस हिंदू मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

गुजरातमधील द बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्थेतर्फे (बीएपीएस) बांधण्यात आलेले हे मंदीर १ मार्चपासून भक्तांसाठी खुले होणार आहे. अबुधाबी-दुबई महामार्गालगत अबू मुरेहा येथे यूएई सरकारने भेट दिलेल्या भूमीवर त्याची बांधणी झाली आहे. भारताबाहेर जगातील हे सर्वांत मोठे हिंदू मंदीर आहे. संयुक्त अरब अमिरातींमधील सात अमिरातींचे प्रतीक म्हणून मंदिराला सात उंच शिखरे आहेत. या बाबतीत आणखी एक योगायोग म्हणजे पंतप्रधान मोदींची ही यूएईला दिलेली सातवी भेट आहे. हे मंदीर जगातील धार्मिक सलोखा आणि एकात्मतेचे प्रतीक बनेल, अशा विश्वास मोदींनी या वेळी व्यक्त केला. या प्रसंगी मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन यूएईचे अध्यक्ष मोहम्मद बिन झायेद अल नह्यान यांच्यासह सर्व उपस्थितांनी उभे राहून स्वामीनारायण यांना वंदन केले.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस