राष्ट्रीय

बिहारमध्ये जदयूच्या सर्व १६ उमेदवारांची यादी जाहीर

विधान परिषदेचे सभापती देवेशचंद्र ठाकूर आणि विजयालक्ष्मी देवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सर्व उमेदवारांची निवड पक्षाध्यक्ष नितीश कुमार यांनी केली आहे.

Swapnil S

पाटणा : संयुक्त जनता दलाचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी रविवारी लोकसभेच्या निवडणुकीसाठी पक्षाच्या सर्वच्या सर्व म्हणजे १६ उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली. या यादीमध्ये इतर मागासवर्गीय आणि अतिमागासवर्गीय उमेदवारांना प्राधान्य देण्यात आले आहे.

पक्षाच्या १२ विद्यमान खासदारांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे, तर सीतामढी आणि सिवन येथील विद्यमान खासदार अनुक्रमे सुनीलकुमार पिंटू आणि कविता सिंह यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. त्यांच्याऐवजी विधान परिषदेचे सभापती देवेशचंद्र ठाकूर आणि विजयालक्ष्मी देवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सर्व उमेदवारांची निवड पक्षाध्यक्ष नितीश कुमार यांनी केली आहे.

उमेदवारांच्या यादीमध्ये इतर मागासवर्गातील सहा, अतिमागासवर्गातील पाच, एक महादलित, एक मुस्लीम आणि तीन सवर्णांचा समावेश आहे. यादीत समाजातील सर्व वर्गांना प्रतिनिधित्व मिळेल याची काळजी घेण्यात आली आहे.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

ठाकरेंचे वलय संपले का?