अनुज अग्निहोत्री UPSC परीक्षेत देशात अव्वल 
राष्ट्रीय

अनुज अग्निहोत्री UPSC परीक्षेत देशात अव्वल; राजेश्वरी सुवे एम दुसरी, आकांश धुल तिसरा; एकूण ९५८ उमेदवार उत्तीर्ण

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) शुक्रवारी २०२५ च्या नागरी सेवा परीक्षेचा निकाल जाहीर केला असून त्यामध्ये राजस्थानचा डॉ. अनुज अग्निहोत्री नागरी सेवा परीक्षेत अव्वल ठरला आहे, तर राजेश्वरी सुवे एम आणि आकांश धुल यांनी अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान पटकावले.

Swapnil S

नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) शुक्रवारी २०२५ च्या नागरी सेवा परीक्षेचा निकाल जाहीर केला असून त्यामध्ये राजस्थानचा डॉ. अनुज अग्निहोत्री नागरी सेवा परीक्षेत अव्वल ठरला आहे, तर राजेश्वरी सुवे एम आणि आकांश धुल यांनी अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान पटकावले. एकूण ९५८ उमेदवार परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत आणि त्यांची विविध केंद्रीय नागरी सेवांमध्ये नियुक्तीसाठी शिफारस करण्यात आली आहे, असेही आयोगाने सांगितले.

भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस), भारतीय परराष्ट्र सेवा (आयएफएस) आणि भारतीय पोलीस सेवेसाठी (आयपीएस) अधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी आयोगाद्वारे दरवर्षी नागरी सेवा परीक्षा घेतली जाते. या परीक्षेत नियुक्तीसाठी एकूण ९५८ उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. यापैकी १८० जण आयएएस अधिकारी होणार आहेत.

सामान्य श्रेणीत ३१७, आर्थिकदृष्ट्या दुर्बल श्रेणीत १०४, इतर मागासवर्ग श्रेणीत ३०६, अनुसूचित जाती श्रेणीत १५८ आणि अनुसूचित जमाती श्रेणीत ७३ जणांचा समवेश आहे. या ९५८ मध्ये पीडब्ल्यूबीडी (दिव्यांगजन) श्रेणीतील ४२ उमेदवारांचा समावेश आहे. सरकारने विविध सेवांमध्ये एकूण १०८७ रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. आयएएस १८०, आयएफएस ५५, आयपीएस १५०, केंद्रीय सेवा (गट 'अ') ५०७ गट 'ब' सेवा १९५.

केंद्रीय लोकसेवा आयोगाने २५८ उमेदवारांची एकत्रित राखीव यादीही तयार केली आहे. ३४८ उमेदवारांची उमेदवारी सध्या तात्पुरती आहे. दोन उमेदवारांचे निकाल रोखण्यात आले आहेत. निकाल जाहीर झाल्यानंतर १५ दिवसांच्या आत उमेदवारांचे गुण ‘यूपीएससी’च्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध होणार आहेत.

टॉप १० उमेदवार

अनुज अग्निहोत्री, राजेश्वरी सुवे एम, आकांश धुल, राघव झुनझुनवाला, इशान भटनागर, झिनिया अरोरा, ए.आर. राजा मोहिद्दीन, पक्षल सेक्रेट्री, आस्था जैन आणि उज्ज्वल प्रियांक अशी टॉप १० उमेदवारांची नावे आहेत.

Mumbai : म्हाडा लॉटरीसाठी मुदतवाढ; १४ मेपर्यंत करता येणार अर्ज, जाणून घ्या सविस्तर

प्रोबेशन कालावधी संपल्यानंतर कामावरून काढणे कायदेशीर; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

विधान परिषद निवडणूक : भाजपतर्फे विधान परिषदेसाठी जठार, कोल्हेंना उमेदवारी

पानसरेंच्या पुस्तकावरचा वाद असंवेदनशील - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नवी मुंबईत वीजपुरवठा विस्कळीत; अनेक ठिकाणी ८ ते १० तास वीज गायब