राष्ट्रीय

मराठी भाषेला तातडीने अभिजात भाषेचा दर्जा बहाल करा,खासदार राहुल शेवाळे यांची मागणी

वृत्तसंस्था

अभिजात भाषेचा दर्जा देण्याविषयी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विषयात स्वतः लक्ष देऊन, तातडीने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा बहाल करा, अशी विनंती शिवसेना लोकसभा गटनेते खासदार राहुल शेवाळे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे. दिल्ली येथे झालेल्या भेटीत या संदर्भातील निवेदन खासदार शेवाळे यांनी गृहमंत्र्यांना दिले. यावेळी त्यांच्यासह खासदार कृपाल तुमाने, खासदार सदाशिव लोखंडे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार संजय मंडलिक, खासदार राजेंद्र गावित उपस्थित होते.

खासदार राहुल शेवाळे यांनी २०१५ मध्ये मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याविषयी लोकसभेत मागणी केली होती. तेव्हापासून सातत्याने याविषयाचा पाठपुरावा खासदार शेवाळे यांच्या वतीने सुरू आहे. गृहमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात शेवाळे यांनी म्हटले आहे की, गेल्या अनेक वर्षांपासून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

'भिडू' बोलून 'जग्गूदादा'ची नक्कल महागात पडणार! जॅकी श्रॉफची हायकोर्टात धाव; खटला केला दाखल

भीमा-कोरेगाव प्रकरण: गौतम नवलखा यांना मोठा दिलासा; SC ने दिला जामीन; उच्च न्यायालयाने घातलेली स्थगिती वाढवण्यास नकार

PM Modi: उमेदवारी दाखल करण्यापूर्वी पंतप्रधान मोदी का गेले कालभैरव मंदिरात?

"सीमा हैदर अनेकदा पाकिस्तानी आर्मी कँम्पमध्ये जायची; ती कम्प्युटर वापरण्यातही पटाईत"; खळबळजनक दावा

उमेदवारच स्वत:च्या मतदानाला मुकले; उमेदवारी एका मतदारसंघात, मतदान दुसऱ्या मतदारसंघात