राष्ट्रीय

तपासात अमेरिकेचा अडथळा ;रश्मिका मंदाना खोटा अश्लील व्हिडीओ

नवशक्ती Web Desk

नवी दिल्ली : संपूर्ण देशाची क्रश असे बिरुद मिरवणाऱ्या व लोकप्रियतेच्या लाटेवर विराजमान असलेल्या रश्मिका मंदाना सिनेतारकेचा एक खोटा अश्लील व्हिडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. डीपफेक व्हिडीओ प्रकारातील या प्रकरणाचा तपास दिल्ली पोलीस करीत असून त्यांनी या प्रकरणी बिहारमधून एका व्यक्तीला अटक देखील केली आहे. त्याचे उपकरण देखील पोलिसांनी जप्त केले आहे. मात्र, याचा पुढील तपास करण्यासाठी इंस्टाग्राम रीलचे यूआरएल शोधणे आवश्यक आहे. एआयचा वापर करुन हे रील तयार करण्यात आले आहे. मात्र, या संबंधित अमेरिकी आयटी कंपनीने जिच्या वेबसार्इटवरुन हा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्या कंपनीने दिल्ली पोलिसांना सहकायर्क करण्यास नकार दिला आहे. ते या व्हिडिओची पाळेमुळे सांगण्यास नकार देत आहेत. एक वेगळ्याचा बार्इच्या शरिराला रश्मिकाचा चेहरा लावून हा फेक व्हिडिओ तयार करण्यात आला होता.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस