राष्ट्रीय

महागाईत वाढ झाल्याने अमेरिकन शेअर बाजारात घसरण

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांच्या संपत्तीत ७० हजार कोटींनी घट झाली आहे.

वृत्तसंस्था

अमेरिकेतील महागाईची आकडेवारी समोर आल्यानंतर मंगळवारी अमेरिकन शेअर बाजार कोसळला आहे. जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये महागाई ०.१ टक्क्यानी वाढली आहे. त्यामुळे अमेरिकन शेअर बाजारातील तिन्ही प्रमुख निर्देशांकांमध्ये मोठी घसरण झाली. त्यामुळे अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांना एका दिवसात सुमारे ८० हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांच्या संपत्तीत ७० हजार कोटींनी घट झाली आहे.

ब्लूमबर्ग अब्जाधीश इंडेक्‍सच्या टॉप २५ मध्ये १७ अमेरिकन अब्जाधीश आहेत. अमेरिकन शेअर बाजारातील घसरणीमुळे सर्व अमेरिकन अब्जाधीशांचे मोठे नुकसान झाले आहे. मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग, गुगलचे संस्थापक सर्गेई ब्रेन आणि मायक्रोसॉफ्टचे माजी सीईओ स्टीव्ह बोमर यांचाही हजारो कोटींचा तोटा झालेल्यांमध्ये समावेश आहे.

अमेरिकन बाजारातील घसरणीतून एकही अमेरिकन अब्जाधीश वाचलेला नाही. मेटा सीईओ मार्क झुकेरबर्ग यांना ३२ हजार कोटींचे नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे गुगलचे संस्थापक सर्गेई ब्रेन यांचेही नुकसान झाले. लॅरी पेज देखील मंदीपासून वाचले नाहीत आणि त्यांना ४०० दशलक्ष कोटींचे नुकसान झाले आहे.

मायक्रोसॉफ्टचे माजी सीईओ स्टीव्ह बोमर यांनाही एका दिवसात ३२ हजार कोटींहून अधिक रुपयांचा फटका बसला आहे. वॉरन बफेच्या संपत्तीतही ३४० कोटी डॉलर म्हणजेच २६,९९६ कोटी रुपयांची घट झाली आहे. त्याचवेळी मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांच्या संपत्तीत २२,२३२ कोटी रुपयांची घट झाली आहे.

गुजरातेत हिंदी सक्ती नसेल, तर ती महाराष्ट्रात कशासाठी? खासदार सुप्रिया सुळे यांचा संतप्त सवाल

आज विजयी मेळावा; उद्धव-राज ठाकरे वरळीत एकाच मंचावर येणार

‘जय गुजरात’मुळे वादंग; अमित शहांपुढे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या घोषणेमुळे विरोधक संतप्त

हायकोर्टाची सुनावणी सोमवारपासून लाईव्ह; सुरुवातीला पाच न्यायमूर्तींचा समावेश

मथुरेची शाही ईदगाह मशीद वादग्रस्त संरचना नाही; अलाहाबाद उच्च न्यायालयाने हिंदू पक्षाची याचिका फेटाळली