राष्ट्रीय

भाजप खासदाराकडून संसदेत आक्षेपार्ह शब्दांचा वापर ; राजनाथ सिंह यांनी मागितली माफी

रमेश बिधूरी यांनी दानिश अली यांना बंडखोर आणि दहशतवादी, तसंच आणखी आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला आहे.

नवशक्ती Web Desk

भारतील जनता पक्षाचे खासदार रमेश बिधूररी यांनी लोकसभेत बहुजन समाज पार्टीचे खासदार दानिश आली यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याचा प्रकार समोर आला आहे. चांद्रयान -३ संबंधी चर्चा सुरु असताना भाजप खासदार बिधूरी यांनी आक्षेपार्ह आणि असंसदीय शब्द वापरले. यावरुन त्यांच्यार टीका केला जात आहे. टीएमसी खासदार महुआ मोईत्रा यांनी देखील त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.

देशाचे संरक्षणमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह यांनी देखील विधूरी यांनी वापरलेल्या अपशब्दा बद्दल दुख: व्यक्त केलं आहे. त्यांनी जर रमेश विधूरी यांनी आक्षेपार्ह विधान केलं असेल तर ते रेकॉर्डवरून हटवलं जावं आणि मी त्याबद्दल खेद व्यक्त करतो असं म्हटलं आहे.

महुआ मोईत्रा यांनी केला कारवाईची मागणी

तृणमूल काँग्रेसच्या खासदार महूआ मोईत्रा यांनी देखील भाजप खासदार रेमश बिधूरी यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. भाजप खासदार बिधूरी यांनी लोकसभेत ऑन रेकॉर्ड आक्षेपार्ह शब्द वापरले. मर्यादेचे रक्षणकर्ते लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, विश्वगुरु नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा काही कारवआई करतील का ? असा सवाल महुआ मोईत्रा यांनी उपस्थित करत बिधूरी यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. त्यांनी एक्स या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर यासंबंधीचा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

काय आहे प्रकरण?

विरोधी पक्षांच्या काही खासदारांनी संसदेत चंद्रयान-३ मोहिमेचं श्रेय पीएम मोदी यांनी देण्याबाबत प्रश्न उपस्थित केले होते. यावर बोलताना भाजप खासदार रमेश बिधूरी यांनी जर देशात एम्स आणि दुसऱ्या संस्था बांधण्यात आले आहेत ते देशाच्या नागरिकांनी बांधलेत तर ते सर्व एका कुटुंबाच्या नावावर का आहेत? त्याच बरोबर चांद्रयान महिमेच्या यशाचं श्रेय मोदींना दिलं जात आहे. मग तुमचं पोट का दुखतंय असं म्हटलं. यावेळी खासदार दानिश अली यांनी त्यांना मधेच अडवलं. यावर रमेश यांनी त्यांना आक्षेपार्ह शब्दात उत्तर दिलं. तसंच बिधूरी यांनी दानिश अली यांना बंडखोर आणि दहशतवादी असं देखील म्हटलं.

बिधूरी यांनी वापरलेल्या आक्षेपार्ह शब्दांनंतर संसदेतील विरोधी पक्षांच्या खासदारांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. यावेळी रमेश बिधूरी यांनी माफी मागितली पाहीजे. तसंच त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी विरोधी पक्षातील खासदारांनी केली.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी