राष्ट्रीय

दारू पाजून भटक्या कुत्र्याचा छळ; सोशल मीडियावर Video व्हायरल, आरोपी पोलिसांच्या ताब्यात

उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यात भटक्या कुत्र्याला जबरदस्तीने दारू पाजून छळ केल्याचा धक्कादायक प्रकार व्हायरल झाला असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

किशोरी घायवट-उबाळे

उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातून प्राण्यांवरील क्रूरतेची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने भटक्या कुत्र्याला जबरदस्तीने दारू पाजत त्याचा छळ केल्याचा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

व्हायरल व्हिडीओत काय?

समोर आलेल्या व्हिडीओमध्ये, एक व्यक्ती कुत्र्याला जबरदस्तीने पकडून ठेवताना, त्याचं तोंड उघडून थेट बाटलीतून दारू ओतताना दिसतो. कुत्रा स्वतःला सोडवण्यासाठी झगडत असताना, वेदनेने विव्हळताना दिसतो. मात्र तरीही ती व्यक्ती निर्दयीपणे कुत्र्याला दारू पाजतो. या संतापजनक कृत्यामुळे सोशल मीडियावर प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.

आरोपी अटकेत

पीटीआयच्या वृत्तानुसार, त्या व्यक्तीची ओळख जितेंद्र उर्फ बल्लम अशी असून तो किर्थल गावचा रहिवासी आहे. पोलिसांनी त्याला रामाला पोलीस ठाणे हद्दीतून अटक केली आहे. त्याच्यावर प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

बंगळुरूमधील आणखी एक धक्कादायक प्रकार

दरम्यान, प्राण्यांवरील क्रूरतेचा आणखी एक धक्कादायक प्रकार बंगळुरूच्या बागलूर परिसरात समोर आला आहे. येथे एका घरकाम करणाऱ्या महिलेने लिफ्टमध्ये पिल्लाला जमिनीवर आपटून ठार मारल्याचा आरोप आहे. ही घटना एका अपार्टमेंटमध्ये घडली असून, बागलूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

सलग समोर येणाऱ्या अशा घटनांमुळे प्राण्यांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

भारतावर आता ५०० टक्के टॅरिफ? ट्रम्प प्रशासन 'रशियावरील निर्बंध' विधेयकाद्वारे पुन्हा झटका देण्याच्या तयारीत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास; “मुंबईचा महापौर मराठी हिंदू...

"हॉटेलमध्ये बोलावले अन्..."; अल्पवयीन नेमबाज युवतीचा राष्ट्रीय प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; POCSO अंतर्गत गुन्हा दाखल

Mumbai : कांदिवलीमध्ये ट्रेडिंगच्या बहाण्याने व्यावसायिकाची लाखोंची फसवणूक; भावाला अटक, बहीण फरार

Bigg Boss Marathi 6 : श्रेयस तळपदे जाणार 'बिग बॉस'च्या घरात? अभिनेत्याने स्वतःच सांगितलं, "लोक प्रसिद्धीसाठी काहीही करतात"