राष्ट्रीय

उत्तर प्रदेश हिंसाचार ; मास्टरमाईंड आरोपी मोहम्मद जावेदच्या घरावर बुलडोझर चालवला

वृत्तसंस्था

दिल्लीच्या जहांगिरपुरी इथे हिंसाचारातील आरोपींची घरे बुलडोझरने पाडल्यानंतर आता अशीच कारवाई उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये करण्यात आली आहे. प्रयागराजमधील अटाला इथे शुक्रवारी नमाज पठणानंतर हिंसाचाराची घटना घडली होती. या हिंसाचाराचा मास्टरमाईंड आरोपी मोहम्मद जावेद उर्फ जावेद पंप याच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आला आहे. यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका घराबाहेर हजर असून हिंसाचाराच्या ठिकाणी एक किलोमीटरच्या परिघात १० हजार जवान तैनात आहेत. ठिकठिकाणी बॅरिकेडिंग करण्यात आले आहे. आजूबाजूच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.

प्रयागराज विकास प्राधिकारणाने (पीडीए) नोटीस जाहीर करत १२ जून रोजी सकाळी ११ वाजता घर खाली करण्याची नोटीस जावेद पंपच्या घरावर चिटकवली होती. जावेदचे घर बेकायदेशीररीत्या बांधल्याचे या नोटिशीत म्हटले आहे. दंगल करणाऱ्या ७० जणांची नावे प्रयागराज पोलिसांनी सांगितली आहेत. त्यांच्यावर २९ कलमे लावण्यात आली आहेत. आतापर्यंत ६८ गुन्हेगारांना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांची रवानगी नैनी मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. यामध्ये चार अल्पवयीन असून, त्यांना बालनिरीक्षणगृहात पाठवण्यात आले आहे. व्हिडीओ आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस सध्या हिंसाचार करणाऱ्यांचा शोध घेत आहेत. अटाळा, कारली आणि इतर लगतच्या भागात पोलीस सातत्याने छापे टाकत आहेत; मात्र बहुतांश दंगेखोर घर सोडून पळून गेले आहेत. घरी फक्त महिलाच आहेत. शौकत अली मार्ग, मिर्झा गालिब रोड ते मजीदिया इस्लामिया इंटर कॉलेजपर्यंत सर्व घरांना कुलूप आहे. सीसीटीव्हीद्वारे ओळख पटल्यानंतर संपूर्ण अटाळा परिसरात शांतता आहे.

'त्या' कंपनीचे अजून ८ बेकायदा होर्डिंग्ज, BMC ची रेल्वेला नोटीस; पालिकेने होर्डिंग हटवल्यास खर्च रेल्वेकडून वसूल करणार

विभवकुमारने केली लाथाबुक्क्यांनी मारहाण; स्वाती मालीवाल यांनी नोंदविला 'एफआयआर'

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या दीड तासांचा ब्लॉक, 'या' वेळेत वाहतूक राहणार बंद

छगन भुजबळ नाराज; प्रचारात फारसे सक्रिय नसल्याने चर्चांना उधाण

सिंचन घोटाळ्यात तथ्य, मात्र अजितदादा दोषी नाहीत - फडणवीस