राष्ट्रीय

Uttarkashi Tunnel Collapse: कामगारांना वाचवण्यासाठी बोगद्यात २२ मीटरपर्यंत ड्रिलिंग

प्रतिनिधी

उत्तरकाशी : सिल्क्यारा बोगद्यात पाच दिवसांपासून अडकलेल्या ४० मजुरांना वाचवण्यासाठी दिवस-रात्र प्रयत्न सुरू आहेत. शुक्रवारी बोगद्यातील मलब्यात २२ मीटरपर्यंत ड्रिल करण्यात आले. कामगारांना वाचवण्यासाठी ६० मीटरपर्यंत ८०० मिमीचे ड्रिलिंग करणे गरजेचे आहे.

कामगारांपर्यंत पोहोचण्यासाठी ९०० मिमीचा पाइप टाकण्याचे काम सुरू आहे. हे ड्रिलिंग करायचे काम मोठे मशीन करत आहे. त्यामुळे कामगारांचा जीव वाचवता येऊ शकेल, असे एनएचआयडीसीएलचे संचालक अंशू खालखो यांनी सांगितले. बोगद्यात अडकलेल्या कामगारांना अन्न, पाणी पुरवले जात आहे. त्यांची प्रकृती चांगली आहे. तसेच ड्रिलिंग करणारे ऑगर मशीन व्यवस्थित काम करत आहे. या कामगारांची देवाच्या दयेने लवकर सुटका होवो, असे नवयुग इंजिनिअरिंग कंपनीचे पीआरओ जी. एल. नाथ यांनी सांगितले.

पोलीस, एनडीआरएफ, एसडीआरएफ व आयटीबीपी व वैद्यकीय पथक तैनात आहेत. आपत्कालीन पथकाकडून सुटकेबाबत सराव करून घेतला जात आहे. तसेच त्यांचे मनोबल कायम ठेवण्यासाठी त्यांच्या कुटुंबासोबत बोलायला दिले जात आहे.

जनरेटरमधील तेल संपतेय

बोगद्यात अडकलेल्या मजुरांकडे जनरेटर होता. त्यामुळे बोगद्यात लाइट होती. मात्र, हळूहळू त्यातील इंधन संपत आहे. त्यामुळे लाइट जाण्याचाही धोका आहे.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त