राष्ट्रीय

Uttarkashi Tunnel Rescue: कोणत्याही क्षणी होऊ शकते कामगारांची सुटका; उत्तराखंडमधील रेस्क्यू ऑपरेश अखेरच्या टप्प्यात

नवशक्ती Web Desk

उत्तराखंडच्या उत्तरकाशी बोगद्यात अडकेल्या मजुरांची अखेर सुटका होत आहे. याठिकाणी सुरु असलेल्या रेस्क्यू ऑपरेशनचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे. १२ नोव्हेंबर पासून तब्बल ४१ मजूर याठिकाणी अडकले आहेत. त्यादिवसापासून या मजुरांच्या सुटकेसाठी दिवसरात्र प्रयत्न सुरु आहेत. उत्तरकाशी येथील सिल्क्यारा बोगद्यात हे कामगार अडकले आहेत. या कामगारांना बाहेर काढल्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. यासाठी रुग्णवाहिका देखील सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. तसंच या रुग्णांसाठी ४१ बेड देखील सज्ज ठेवण्यात आले आहेत.

या मजुरांची सुटका करण्यासाठी या बोगद्यात ८०० मिमी व्यासाची पाईप सोडण्यात आली. या पाईपमधून NDRFची टीम मजुरांपर्यंत पोहचली. याच पाईपद्वारे मजुरांच्या सुटकेचे प्रयत्न केले जात आहेत.

मागील १६ दिवसांपासून याठिकाणी रेक्स्कू ऑपरेशन सुरु आहे. दिवाळीच्या आदल्या दिवशी माती कोसळून ४१ मजूर बोगद्यात अडकले. तेव्हापासून आजपर्यंत गेली १७ दिवस याठिकाणी बचावरकार्य सुरु आहे.

उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्हा मुख्यालयापासून ३० किमी अंतरावर बोगद्याचं काम सुरु आहे. केंद्र सरकारची महत्वाची चार धाम ऑल वेदर सडक सिल्कियारा ही योजना सुरु आहे. या प्रकल्पामुळे कोणत्याही ऋतुमध्ये, कोणत्याही वातावरणात रस्ते वाहतूक करता येणार आहे. ब्रम्हखाल-यमुनोत्री राष्ट्रीय राज्यमार्गावरील या बोगद्याचं काम सुरु आहे. हा बोगदा 4. 5 किमी लांबीचा हा बोगदा आहे.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त