Photo : X (@IN_WNC)
राष्ट्रीय

नौदलाच्या पश्चिम विभाग प्रमुखपदी व्हाईस ॲॅडमिरल राहुल गोखले

भारतीय नौदलाच्या पश्चिम विभागाच्या प्रमुखपदाचा कार्यभार व्हाईस ॲडमिरल राहुल विलास गोखले यांनी नुकताच स्वीकारला.

Swapnil S

मुंबई : भारतीय नौदलाच्या पश्चिम विभागाच्या प्रमुखपदाचा कार्यभार व्हाईस ॲडमिरल राहुल विलास गोखले यांनी नुकताच स्वीकारला.

दिशादर्शन क्षेत्रातील तज्ज्ञ असलेल्या गोखले यांनी १ ऑक्टोबर रोजी या पदाचा कार्यभार स्वीकारला. गोखले हे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (खडकवासला), डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज (वेलिंग्टन), नेव्हल वॉर कॉलेज (गोवा) आणि ऑस्ट्रेलियन डिफेन्स कॉलेज (कॅनबेरा) या संस्थांचे माजी विद्यार्थी आहेत.

त्यांनी आपल्या कारकीर्दीत ‘आयएनएस कोरा’चे कार्यकारी अधिकारी आणि ‘आयएनएस खुर्की’ व ‘आयएनएस कोलकाता’चे कमांडिंग अधिकारी म्हणून काम केले आहे. तसेच त्यांनी नौदलाच्या पूर्व विभागाचे परिचलन अधिकारी म्हणूनही काम केले. त्यांनी इस्लामाबाद येथील भारतीय उच्चायोगात नौदल सल्लागार म्हणूनही सेवा दिली आहे.

महाराष्ट्रात ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; 'या' दिवसांमध्ये बाहेर पडताना घ्या काळजी, मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा

इटलीतील सुट्टीचा शेवटचा दिवस ठरला आयुष्याचा शेवट! नागपूरच्या हॉटेल व्यावसायिक दाम्पत्याचा अपघातात मृत्यू, तिन्ही मुलं जखमी

'पिंजऱ्याची चंद्रा’ काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन

आयात-निर्यात व्यवहारांसाठी आता डिजिटल बॉन्ड; कागदी स्टॅम्प पेपरला ‘गुडबाय’; महसूल मंत्री बावनकुळेंचा महत्त्वाकांक्षी निर्णय

आंबा घाटातील साडेतीन किलोमीटर बोगद्याला मंजुरी; कोकण-प. महाराष्ट्र प्रवास होणार जलद