राष्ट्रीय

Video : बापरे..! घरात एक, दोन नव्हे...आढळले तब्बल चार कोब्रा नाग; कुटुंबीयांचा उडाला थरकाप

Rakesh Mali

नाग हे नाव ऐकताच अंगावर काटा येतो. आपण चालत असताना अचानक नाग आडवा गेला तरी आपल्या हृदयाचे ठोके चुकतात. अनेकदा परिसरात नाग निघाला तर बघ्यांची मोठी गर्दी जमते. अशीच एक घटना पंजाबमधून समोर आली आहे. पंजाबच्या जालंधरमधलील एका घरात कोब्रा जातीचे एक, दोन नव्हे तर, तब्बल चार नाग आढळून आले. त्यानंतर घरातील सदस्यांचा थरकाप उडाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

जालंधर कँटमधील दीपनगर भागात 707 नंबरच्या विजय व्हिलामध्ये चार कोब्रा जातीचे नाग आढळले. व्हिलाचे मालक मुकेश कुमार धवन यांना त्यांच्या बेडरूममध्ये काही दिवसांपूर्वी सापाची कात आढळून आली होती. पण, आता बेडरुममध्येच तेही डोळ्यांसमोर चार कोब्रा नाग दिसल्याने ते प्रचंड घाबरले. त्यांनी तातडीने नागांना पकडण्यासाठी दोन सर्पमित्रांना पाचारण केले. अखेरीस सर्पमित्रांनी अथक परिश्रम करुन या नागांना पकडले. घरी आई, पत्नी आणि लहान मुलगीही होती. हे नाग किती दिवसांपासून घरात होते, याबाबत कल्पना नाही. पण, सुदैवाने कोणालाही काही हानी झाली नाही. मात्र, कोब्रा जातीचे नाग अतिविषारी असल्याने सर्वांमध्ये घबराट पसरली होती, असे मुकेश यांनी सांगितले.

दरम्यान, जालंधरमध्ये मोठ्या प्रमाणावर साप निघण्याच्या घटना घडतात. स्पेक्टेक्लड कोब्रा, घोणस, कॉमन क्रेट अशा सापांच्या प्रजाती याभागात आढळतात. 15 ऑगस्ट रोजी जालंधर पश्चिमेकडील राम शरण कॉलनीत पिता-पुत्राला घराच्या टेरेसवर झोपलेले असताना नागने चावा घेतल्याची घटना घडली होती. यानंतर तात्काळ दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, यात वडील राम प्रीत शहा यांचा रुग्णालयात मृत्यू झाला होता.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस