लंडनला जाणाऱ्या विमानातील अन्य प्रवासी महिलेने काढलेल्या सेल्फीमध्ये विजय रूपाणी दिसत असल्याचा दावा केला जात आहे. (डावीकडे) 
राष्ट्रीय

Ahmedabad Plane Crash: पत्नी-मुलीची भेट हुकली! गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचा मृत्यू; विमानातील अखेरचा फोटो व्हायरल

अहमदाबादहून लंडनला निघालेले विमान उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत मेघाणीनगर परिसरात कोसळल्याने गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचा मृत्यू झाला आहे.

Swapnil S

अहमदाबादहून लंडनला निघालेले विमान उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत मेघाणीनगर परिसरात कोसळल्याने गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचा मृत्यू झाला आहे.

मुलगी लंडनमध्ये असल्यामुळे विजय रूपाणी यांच्या पत्नी अंजली यासुद्धा गेल्या काही महिन्यांपासून मुलीच्या घरी गेल्या होत्या. मुलीला भेटण्यासाठी आणि पत्नीला पुन्हा मायदेशी परत आणण्यासाठी विजय रूपाणी हे गुरुवारी दुपारच्या विमानाने लंडनला निघाले होते. एअर इंडियाचे बोइंग ड्रीमलायनर विमानातील २-डी या सीट क्रमांकावरून ते बिझनेस क्लासमधून प्रवास करत होते. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. मुलीची भेट घेण्यासाठी आणि पत्नीला घरी आणण्याआधीच त्यांना मृत्यूने गाठले.

दरम्यान, लंडनला जाणाऱ्या विमानात बसल्यानंतरचा त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याच विमानातील अन्य प्रवासी महिलेने काढलेल्या सेल्फीमध्ये रूपाणी दिसत असून हाच त्यांचा अखेरचा फोटो ठरल्याचा दावा केला जात आहे. तथापि, नवशक्तिने फोटोची स्वतंत्रपणे सत्यता पडताळणी केलेली नाही.

विजय रुपाणी हे भाजपचे गुजरातमधील ज्येष्ठ आणि बडे नेते होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अत्यंत विश्वासू म्हणून विजय रूपाणी ओळखले जायचे. मोदी हे २०१४मध्ये देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर आनंदीबेन पटेल यांच्याकडे गुजरातचे मुख्यमंत्रीपद आले होते. पण काही घटना हाताळण्यात असमर्थ ठरल्याबद्दल आनंदीबेन यांना हटवून विजय रूपाणी यांच्यावर मोदींनी विश्वास दाखवला होता.

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video