राष्ट्रीय

राष्ट्रीय सिनेमा दिनानिमित्त कोणताही चित्रपट पाहा ७५ रुपयांत

सध्या प्रदर्शित झालेले चित्रपटही याच तिकिटात पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे रसिकांचे पैसे वाचणार आहेत

वृत्तसंस्था

सध्या एका कुटुंबाला कोणताही चित्रपट पाहायचा असल्यास दोन हजार रुपयांची नोट सहज मोडावी लागते. मल्टिप्लेक्समध्ये तिकिटांचे दर ३०० ते ५०० रुपयांच्या घरात गेल्यामुळे इच्छा असूनही अनेक कुटुंबांना चित्रपट पाहण्यास मुरड घालावी लागते. याचा मोठा परिणाम चित्रपटांच्या गल्ल्यावर झाला आहे. रसिकांना पुन्हा चित्रपटगृहात ओढण्यासाठी नामी शक्कल लढवण्यात आली असून १६ सप्टेंबरला राष्ट्रीय सिनेमा दिवसानिमित्त देशातील चार हजार सिनेमागृहांत ७५ रुपये तिकीटदरात चित्रपट पाहायला मिळणार आहे.

सध्या प्रदर्शित झालेले चित्रपटही याच तिकिटात पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे रसिकांचे पैसे वाचणार आहेत. गेल्या दोन वर्षांपासून देशात कोरोनाची लाट पसरली होती. त्याचा मोठा फटका चित्रपटसृष्टीला बसला. चित्रपटगृहे बंद असल्याने प्रेक्षकांनी सिनेमांकडे पाठ फिरवली. त्यातच अनेकांच्या नोकरी व व्यवसायावर परिणाम झाला. त्यामुळे चित्रपट पाहणे ही चैन बनली. त्यातच ओटीटी प्लॅटफार्म स्वस्त व मस्त मनोरंजन करत असल्याने प्रेक्षक त्याच्याकडे वळले. तसेच आशय व विषयातील वैविध्यामुळे प्रेक्षकांच्या ओटीटीवर उड्या पडू लागल्या. ३०० ते ४०० रुपये महिन्यात चित्रपट, वेबसिरीज पाहायला मिळतात. यामुळे प्रेक्षक मोठ्या प्रमाणावर ओटीटीकडे वळले. त्याचा मोठा फटका चित्रपट व्यवसायाला बसला.

मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाने १६ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय सिनेमा दिवसानिमित्त ७५ रुपयांत तिकीट देण्याचे जाहीर केले. देशातील चार हजार सिनेमागृहात ही योजना राबवली जाणार आहे. पीव्हीआर, आयनॉक्स, वेव्ह, एम२के, मूव्ही टाईम, मिराज, सिटी प्राईड, सिनेपोलीस, मुक्ता ए२ आदी सर्व मल्टिप्लेक्स ७५ रुपयांत सिनेमाचे तिकीट देणार आहेत.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद होणार नाही; देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

वेतन श्रेणीच्या प्रशिक्षणासाठी अनुपस्थित शिक्षकांना दिलासा; ३ नोव्हेंबरपर्यंत प्रशिक्षण घेता येणार

एसटी प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियेत मोठे पाऊल; सहा आठवड्यांत चौकशी पूर्ण करत अहवाल सादर करणे बंधनकारक

जळगाववरून आता दररोज विमानसेवा सुरू; जळगाव-मुंबई आणि जळगाव-अहमदाबाद प्रवासी सेवा

कल्याणमध्ये उद्या पाणीपुरवठा ठप्प