राष्ट्रीय

आमच्याकडे प्रस्ताव आल्यास विचार करू, भारत नाव करण्याबाबत संयुक्त राष्ट्र प्रवक्त्याची प्रतिक्रिया

विक्रांत नलावडे

नवी दिल्ली : मोदी सरकारने देशाचे नाव 'इंडिया' बदलून अधिकृतरीत्या 'भारत' केले तर संयुक्त राष्ट्र संघ काय करेल, असा प्रश्न अनेकांच्या मनात आला असेल. संयुक्त राष्ट्रसंघाच्या एका वरिष्ठ प्रवक्त्याने यावर म्हटले आहे की, नाव बदलण्याचा प्रस्ताव भारताकडून आला तर संयुक्त राष्ट्र विचार करेल. या आधी अनेक देशांनी नावे बदलली आहेत.

संयुक्त राष्ट्रसंघाचे डेप्युटी प्रवक्ते फरहान हक यांनी बुधवारी या विषयी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की, या आधी संयुक्त राष्ट्रसंघाने अनेक राष्ट्रांच्या नाव बदलाच्या अधिकृत प्रस्तावांना प्रतिसाद दिला आहे. गेल्याच वर्षी टर्की देशाने आपले नाव बदलून टर्कीए केले आहे. १९७२ साली सिलोनचे श्रीलंका करण्यात आले होते, तर २०१९ साली बर्माने आपले नाव बदलून म्यानमार केले आहे. तसेच २०१८ साली इस्वातीनी देशानेही आपले नाव बदलून स्वाझीलँड केले आहे. तसेच १९९७ साली झैरे देशाने नाव बदलून काँगो डीआरसी असे नवे नाव धारण केले आहे. अन्य काही देशांनीही आपल्या नावात बदल केल्याची उदाहरणे आहेत. टर्की सरकारकडून अधिकृत विनंती आल्यानंतर आम्ही त्वरित प्रतिसाद दिला होता. आमच्याकडे विनंत्या जशा येतात तसा आम्ही प्रतिसाद देतो, असे हक यांनी म्हटले आहे.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस