संघाला प्रश्न विचारल्यास भाजप का फुत्कारतो? कर्नाटकचे गृहमंत्री प्रियांक खर्गे यांचा सवाल (Photo-X)
राष्ट्रीय

संघाला प्रश्न विचारल्यास भाजप का फुत्कारतो? कर्नाटकचे गृहमंत्री प्रियांक खर्गे यांचा सवाल

भाजप हे केवळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक साधन म्हणून काम करत आहे. संघाला प्रश्न विचारल्यावर भाजप का फुत्कारतो, असा सवाल कर्नाटकचे गृहमंत्री प्रियांक खर्गे यांनी केला आहे.

Swapnil S

बंगळुरू : भाजप हे केवळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक साधन म्हणून काम करत आहे. संघाला प्रश्न विचारल्यावर भाजप का फुत्कारतो, असा सवाल कर्नाटकचे गृहमंत्री प्रियांक खर्गे यांनी केला आहे.

खर्गे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे त्यांच्या घटनात्मक आणि आर्थिक बाबींच्या पूर्ततेबाबत स्पष्टीकरणाची मागणी केली आहे.

‘एक्स’वर पोस्ट करत खर्गे यांनी दावा केला की, जेव्हा कोणी संघाला प्रश्न विचारतो, तेव्हा भाजपचा संयम सुटतो आणि तो ‘फुत्कारतो’. ज्या संघटनेने स्वातंत्र्यलढ्यात काहीही योगदान दिले नाही, ती संघटना आता देशाला देशभक्तीचे धडे का देत आहे आणि नागपूर येथील संघ

मुख्यालयात तिरंगा फडकवण्यासाठी ५२ वर्षे का लागली, असे प्रश्न विचारल्यावर भाजपची नेहमीच बचावात्मक प्रतिक्रिया का येते, असा सवाल त्यांनी केला.

खर्गे यांनी विचारले की, संघ खरोखर कोणाच्या राज्यघटनेवर निष्ठा ठेवतो. बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेवर की ‘ज्या राज्यघटनेची त्यांनी स्वतः रचना केली असती त्यावर’? तसेच, ही संघटना स्वतःची नोंदणी करण्यास किंवा कर भरण्यास नकार का देत आहे, असा आरोपही त्यांनी केला.

खर्गे यांनी मोहन भागवत यांना एक खुले पत्र लिहून संस्थेची १०० वर्षे पूर्ण होत असताना तिची कायदेशीर स्थिती, आर्थिक पारदर्शकता आणि घटनात्मक उत्तरदायित्वावर स्पष्टीकरण मागितले. संस्थेने ‘पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि घटनात्मक पालनाचे सर्वोच्च मानक’ पाळले पाहिजे, असे खर्गे यांनी म्हटले.

आपण धमक्यांना घाबरत नाही - खर्गे

लोकसभेचे खासदार रमेश जिगजिनागी यांनी इशारा दिला होता की, ज्याने ज्याने ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’ला स्पर्श करण्याचा’ प्रयत्न केला, तो सुटला नाही. यावर खर्गे यांनी विचारले की, संघ ही एखादी ‘दहशतवादी संघटना’ आहे का, जी प्रश्न विचारणाऱ्यांना ‘संपवून टाकते’? तसेच, आपण आंबेडकरांच्या विचारांचे अनुयायी असून अशा धमक्यांना घाबरत नाही.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा)

Mumbai : गोरेगाव-मुलुंड २० मिनिटांत; जीएमएलआर प्रकल्पात ‘तुळशी’ खोदणार बोगदा, नॅशनल पार्कखाली भूमिगत बोगदा

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण : मुख्य आरोपी सचिन अंदूरेला जामीन; जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती, HC चा मोठा निर्णय

बापरे! मध्यान्ह भोजनात मिठाऐवजी चक्क डिटर्जंट? जेवणानंतर २४ हून अधिक विद्यार्थी रुग्णालयात दाखल, VIDEO

संतापजनक! पालघरमध्ये १० वर्षांच्या मुलीवर ५० वर्षीय काकाकडून अत्याचार; FIR नोंदवण्यास पोलिसांची टाळाटाळ? कुटुंबीयांचा गंभीर आरोप

Mumbai : चर्चगेट येथील मुलींच्या हॉस्टेलमधील पाणीटंचाईची हायकोर्टाकडून दखल; महापालिका आणि विद्यापीठाला नोटीस