विमान प्रवासात महिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न पुन्हा एकादा ऐरणीवर आला आहे. विमानात देखील महिलांची छेड काढल्याच्या घटना सात्याने समोर येत आहेत. अशात आता मुंबईहून गुवाहाटीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात(Mumbai-Guwahati Flight) एका महिलेचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंडिगोच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार १० सप्टेंबर रोजी 6E 5319 या फ्लाइटमध्ये ही घटना घडली. पीडितेने आरोपीवर कथिक लैगिक अत्याचाराची तक्रार दाखल केल्यानंतर गुवाहाटी येथे विमान उतरल्यानंतर आरोपीला आसाम पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं.
अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने या प्रकरणी स्थानिक पोलिसांकडे एफआयआर दाखल केला आहे. त्या आधारावर आरोपीवर कारवाई करण्यात आली आहे. इंडिगोच्या प्रवक्त्याने आम्ही तपासात आवश्यक तेथे मदत करु. तसंच तक्रार मिळताच आम्ही तातडीने कारवाई केल्याच सांगितलं.
सध्या फ्लाइट्समध्ये लैंगिक छळाच्या किमान चार घटना समोर आल्या आहेत. यापूर्वी १६ ऑगस्ट रोजी दिल्ली-मुंबई स्पाईसजेट कथिक लैंगिक छळाचं प्रकरण समोर आलं होतं. याबाबचा व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.