राष्ट्रीय

साकेत न्यायालयात गोळीबार; तोतया वकील बनून आलेल्या आरोपीने महिलेवर झाडल्या गोळ्या

आज दिल्लीतील साकेत न्यायालयामध्ये एका व्यक्तीने तोतया वकील बनून महिलेवर ४ गोळ्या झाडल्या, यामध्ये महिला जखमी झाली असून उपचार सुरु

नवशक्ती Web Desk

आज दिल्लीतील साकेत न्यायालयामध्ये एक धक्कादायक प्रकार घडला. साकेत न्यायालय परिसरात गोळीबार झाल्याची घटना घडली. यामध्ये एक महिला जखमी झाली असून तिला तातडीने एम्स रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

या प्रकरणाची माहिती मिळताच, दिल्ली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, न्यायालय परिसरात झालेल्या या गोळीबारामुळे एकच खळबळ उडाली असून सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील साकेत न्यायालयात एक व्यक्ती वकिलाचे कपडे परिधान करून घुसला होता. यावेळी त्याने साधी साधत एका महिलेवर तब्बल ४ गोळ्या झाडल्या. यातील काही गोळ्या या महिलेला लागल्यापासून घटनास्थळी उपस्थित असलेल्या दिल्ली पोलिसांच्या एसएचओने तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, त्या व्यक्ती आणि या महिलेमध्ये पैशांवरून वाद सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच, आरोपीची ओळख पटली असून पोलिसांनी पुढील कारवाईला सुरुवात केली आहे.

‘जीआर’वरून रणकंदन! शासन निर्णय सरसकटचा नाही, खऱ्या कुणबींनाच आरक्षण मिळेल - मुख्यमंत्री

ओबीसी महासंघाचे उपोषण मागे; राज्य सरकारकडून १४ पैकी १२ मागण्या मान्य

१३ सप्टेंबरला मोदी मणिपूर दौऱ्यावर? कुकी समूहासोबत शांतता करार

चीनच्या शक्तिप्रदर्शनाने जगाला धडकी

रिझर्व्हेशन नव्हे, रिप्रेझेंटेशन