राष्ट्रीय

"लिहून घ्या, तुम्हाला गुजरातमध्ये हरवणार..." राहुल गांधींचं BJPला ओपन चॅलेंज, पाहा लोकसभेत नेमकं काय घडलं?

Suraj Sakunde

नवी दिल्ली : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी खुले आव्हान देत गुजरातमध्ये भाजपचा पराभव करणार असल्याचे म्हटले आहे. लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा करताना राहुल गांधी यांनी हे मोठे विधान केले. राहुल गांधी लोकसभेत म्हणाले की, कोणत्याही लघु आणि मध्यम उद्योजकाला विचारा की नोटाबंदी का झाली? ते म्हणतील की, अब्जाधीशांना मदत करण्यासाठी हे केले गेले. मी गुजरातला गेलो, टेक्सटाईल मालकांशी बोललो, नोटाबंदी का झाली, जीएसटी का आला, असे प्रश्न विचारले. त्यांनी मला स्पष्टपणे सांगितले की, अब्जाधीशांच्या मदतीसाठी जीएसटी आणला आहे. नरेंद्र मोदी अब्जाधीशांसाठी काम करतात. विशेष म्हणजे राहुल गांधी यांनी जेव्हा हे वक्तव्य केलं, तेव्हा पंतप्रधान मोदीही सभागृहात उपस्थित होते.

राहुल गांधी नेमकं काय म्हणाले?

राहुल गांधी लोकसभेत बोलत असताना त्यांना सत्ताधाऱ्यांनी अडवलं. त्यानंतर राहुल म्हणाले की, "मी गुजरातला जात असतो. यावेळी गुजरातमध्ये तुमचा पराभव करू. तुम्ही हे लिहून घ्या, गुजरातमध्ये इंडिया आघाडी तुमचा पराभव करणार आहे. यावेळी लोकसभा निवडणुकीत भाजपला गुजरातमध्ये क्लीन स्वीप करता आलेला नाही. काँग्रेस पक्षाने पुनरागमन करत बनासकांठा ही जागा भाजपकडून हिसकावून घेतली आहे. २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत भाजपने सर्व २६ जागा जिंकल्या होत्या. राहुल गांधी गेल्या काही दिवसांपासून गुजरातमध्ये सक्रिय झाले आहेत. अलीकडेच, गुजरातमधील राजकोटमध्ये टीआरपी गेम झोन घटनेतील पीडितांशी त्यांनी संवाद साधला होता.

काँग्रेस-आप एकत्र लढल्या निवडणुका-

२०२४ च्या लोकसभा निवडणुका काँग्रेस आणि आपने गुजरातमध्ये एकत्र लढल्या. राज्यातील २६ पैकी २४ जागांवर काँग्रेसने उमेदवार उभे केले होते, तर आम आदमी पक्षाने दोन जागांवर निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत काँग्रेसला ३१.२४ टक्के मते मिळाली आहेत, तर भाजपला ६१.८६ टक्के मते मिळाली आहेत. आम आदमी पक्षाला (आप) २.६९ टक्के मते मिळाली. काँग्रेस आणि आप एकत्र आल्याने भाजपला राज्यातील सर्व लोकसभेच्या जागा ५ लाखांच्या फरकाने जिंकता आल्या नाहीत. गुजरातमध्ये काँग्रेसने राज्यसभेचे खासदार शक्तीसिंह गोहिल यांच्याकडे जबाबदारी सोपवली आहे.

Mumbai Local Mega Block Update : प्रवाशांनो लक्ष द्या...रविवारी तिन्ही रेल्वे मार्गांवर ब्लॉक, जाणून घ्या डिटेल्स

पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज Metro-3 चे उद्घाटन; अंतर्गत रिंग मेट्रो, ठाणे पालिकेच्या नवीन इमारतीचेही भूमिपूजन

पुणे : बोपदेव घाटात तरुणीवर सामूहिक बलात्कार; पोलिसांकडून संशयित आरोपींचे स्केच जारी

निराधार दुर्गांची जीवनभरारी! बालगृहातील भगिनी ते अधीक्षिका; सांगलीच्या सपनाचा स्फूर्तिदायी प्रवास

इस्त्रायलचा खात्मा करणार; इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांची गर्जना