राष्ट्रीय

यमुनेच्या पाण्याचा दर्जा खराब; संसदेच्या स्थायी समितीची माहिती

यमुना नदीच्या ३३ पैकी २३ ठिकाणच्या पाण्याच्या दर्जाची चाचणी करण्यात आली. हे पाणी खराब असल्याचे दिसून आले आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : यमुना नदीच्या ३३ पैकी २३ ठिकाणच्या पाण्याच्या दर्जाची चाचणी करण्यात आली. हे पाणी खराब असल्याचे दिसून आले आहे. या पाण्यात ऑक्सीजनचे प्रमाण शून्य आहे. जल संसाधनावरील संसदीय स्थायी समितीने ही माहिती दिली.

स्थायी समितीने मंगळवारी हा अहवाल संसदेत सादर केला. ३३ ठिकाणच्या पाहणीनंतर हा अहवाल तयार केला. त्यातील दिल्लीतील ६ ठिकाणचा समावेश आहे. २३ ठिकाणच्या पाण्यात ऑक्सीजनचे प्रमाण शून्य आहे.

दिल्लीतील यमुना नदी सफाई योजना व नदी व्यवस्थापनावरील अहवालाबाबत समितीने इशारा देताना सांगितले की, दिल्ली आणि उत्तर प्रदेशमधील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे निर्माण व आधुनिकीकरण होऊनही प्रदूषण वाढले आहे.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाने राज्य प्रदूषण नियंत्रण बोर्डासोबत जानेवारी २०२१ ते मे २०२३ दरम्यान ३३ ठिकाणी पाण्याच्या गुणवत्तेची चाचणी केली. यात पाण्यातील ऑक्सीजन, पीएच, बायोकेमिकल ऑक्सीजन डिमांड आणि फेकल कोलीफॉर्म आदी चार निकष लावण्यात आले.

उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशातील चार-चार ठिकाणची यमुनेच्या पाण्याची गुणवत्ता चांगली आहे. तर हरियाणातील सहा ठिकाणचे पाणी खराब आढळले आहे. दिल्लीतील ७ ठिकाणचे पाणी २०२१ च्या कोणत्याही निकषांचे अनुपालन करण्यात अपयशी ठरले.

चिखल मोठी समस्या

यमुना नदीच्या तळात जमा झालेला चिखल ही मोठी समस्या आहे. नदीच्या प्रमुख स्थळातील चिखलाचे नमूने घेतले. त्यात क्रोमियम, तांबे, शिसे, निकेल आणि जस्त आदी धातूचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळले.

India T20 World Cup Squad : सूर्यकुमार यादव कर्णधार तर अक्षर पटेलकडे उपकर्णधारपदाची धुरा; गिलला संघातून डच्चू

दिल्ली विमानतळावर प्रवाशाला पायलटकडून मारहाण; सोशल मीडियावर संताप, एअर इंडिया एक्सप्रेसची कारवाई

"आज तुमच्या हक्काचा दिवस..." ; नगरपरिषद निवडणुकीसाठी मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना आवाहन

अंबरनाथ नगरपरिषद निवडणूक : मतदानाच्या दिवशी अंबरनाथमध्ये गोंधळ; २०८ महिला भिवंडीतून आणल्याचा दावा, पोलिसांचा हस्तक्षेप

चीनमधील कॉन्सर्टमध्ये रोबोट्सचा भन्नाट डान्स; एलन मस्क यांची एका शब्दात प्रतिक्रिया, VIDEO व्हायरल