नवी मुंबई

पाच वर्षीय विद्यार्थ्यासोबत शाळेची क्रूर वागणूक; मुख्याध्यापिकेसह दोघांवर गुन्हा दाखल

शालेय फी न भरल्याच्या समजातून सीवूड्समधील एका इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळेच्या व्यवस्थापनाने एका पाच वर्षीय विद्यार्थ्याला वर्गात न बसवता त्याला एकट्याला अन्न पाण्याशिवाय डे-केअरमध्ये बसवून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उडकीस आला आहे.

Swapnil S

नवी मुंबई : शालेय फी न भरल्याच्या समजातून सीवूड्समधील एका इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळेच्या व्यवस्थापनाने एका पाच वर्षीय विद्यार्थ्याला वर्गात न बसवता त्याला एकट्याला अन्न पाण्याशिवाय डे-केअरमध्ये बसवून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उडकीस आला आहे. विशेष म्हणजे या मुलाच्या पालकांनी शाळेची ४२ हजार रुपयांची संपूर्ण फी भरलेली असताना, शाळेने हा प्रताप केल्याचा आरोप पालकांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत केला आहे. या घटनेनंतर सदर मुलाच्या पालकांनी एनआरआय पोलीस ठाण्यात धाव घेऊन संबंधित शाळेच्या मुख्याध्यापिका व महिला समन्वयक विरोधात अल्पवयीन मुलांची काळजी व संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेतील इंग्रजी माध्यमाची शाळा सीवूड्स भागात असून या शाळेने गत २८ जानेवारी रोजी ज्युनिअर केजीमध्ये शिकणाऱ्या एका ५ वर्षीय मुलाला नियमीत वर्गात न बसवता, त्याला एकट्याला डे-केअरमध्ये बसवून ठेवले होते. या मुलाचे वडील त्याला घेण्यासाठी शाळेत गेले, मात्र त्यांच्या मुलाला सोडण्यात आले नाही. त्यामुळे मुलाच्या वडीलांनी वर्ग शिक्षिकेकडे त्याबाबत विचारणा केली असता, त्यांच्या मुलाची फी बाकी असल्याने त्यांच्या मुलाला मुख्याध्यापिका घेऊन गेल्याचे सांगितले.

१ हजार रुपयांसाठी मुलाला डांबून ठेवले

जुलै २०२४ मध्ये शाळेची ४२ हजार रुपयांची संपूर्ण फी भरली होती. तरी देखील त्यांच्या मुलाला शाळेकडून क्रूर वागणूक दिल्याबाबत पालकांनी मुख्याध्यापिकेकडे जाब विचारला असता, त्यांच्या मुलाची १ हजार रुपयांची फी प्रलंबित असल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे ती रक्कमसुद्धा पालकांनी त्यावेळी लगेचच भरून टाकली. दरम्यान, जे पालक मुलांची फी भरत नाहीत, अशा मुलांना क्लासमध्ये न बसवता त्या मुलांना डे-केअरमध्ये बसवण्याचा शाळा व्यवस्थापनाने निर्णय घेतला असल्याचे तक्रारदारांना सांगण्यात आले.

हरिनामाच्या गजराने विठ्ठलाची पंढरी दुमदुमली! पंढरीत १५ लाखांवर वैष्णवांची मांदियाळी; आषाढी एकादशीचा आज मुख्य सोहळा !

महागड्या शक्तिपीठ महामार्गाला आमचा विरोध; सुप्रिया सुळे यांचे ठाम प्रतिपादन

आवाज मराठीचाच! उद्धव-राज ठाकरे तब्बल २० वर्षांनंतर एकाच मंचावर; राज्यभरातील मराठी माणसांमध्ये आनंदाचे वातावरण

डोममध्ये रंगला झिम्मा; शर्मिला ठाकरे, सुषमा अंधारे यांची फुगडी

देशात गरीबांची संख्या वाढणे ही चिंता वाढवणारी बाब; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन