नवी मुंबई

शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याने गुन्हा

मुरूड पोलिसांनी तातडीची दखल घेत शासकीय कामात अडथळा आणला म्हणून तिघांवर ३५३ प्रमाणे गुन्हा दाखल केला

Swapnil S

मुरूड-जंजिरा : रायगड जिल्ह्यातील मुरूड पोलीस स्टेशन येथे शासकीय कामात अथळा निर्माण करीत धमकी दिल्याप्रकरणी तीन आरोपी विरुद्ध मुरूड पोलीस ठाण्यात फिर्याद आरती धीरज पाटील यांनी मुरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मौजे मुरूड पोलीस ठाण्यात दिनांक सायंकाळी साडेपाच वाजता फिर्यादी मुरूड पोलीस ठाणे येथे ठाणे अंमलदार ड्युटी करीत असताना मुरूड शहरातील दरबार रोड परिसरातील ज्या व्यक्तींवर ४९८ अ चा गुन्हा दाखल आहे, त्या तिन्ही व्यक्ती अटकपूर्व जामीन मिळाल्याने त्याची रीतसर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मुरूड पोलीस ठाण्यात आल्या होत्या. त्याचा रीतसर जबाब मुरूड पोलीस लिहून घेत होते व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करीत होते.

याचवेळी विरोधी बाजूचे लोक आले व या तीन व्यक्तींसोबत हुज्जत घालू लागले. त्यांना अंगावर मारावयास धावू लागले. त्यांनी समजावून सांगणाऱ्या पोलिसांनाच उलट सुलट बोलून त्यांनाच धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. याबाबत मुरूड पोलिसांनी तातडीची दखल घेत शासकीय कामात अडथळा आणला म्हणून तिघांवर ३५३ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

गणपती गेले गावाला...! 'पुढच्या वर्षी लवकर या'चा घुमला जयघोष; दहा दिवसांच्या गणेश मूर्तीचे उत्साहात विसर्जन

Mumbai : लालबागचा राजाच्या विसर्जनाला विलंब? तराफ्यावर मूर्ती चढवताना अडचणी

Maharashtra : बाप्पाच्या निरोपावेळी दुर्दैवी घटना; राज्यात ७ जणांचा मृत्यू

मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देणारा गजाआड; गोंधळ माजवण्यासाठी पाठवला संदेश

चौकशीची मागणी माझी वैयक्तिक! अंजना कृष्णा धमकीप्रकरणी मिटकरी यांचे घूमजाव